भाजप-शिंदे गटाचे टेन्शन वाढले कारण…..

एकनाथ शिंदे यांचा बंड त्यानंतर झालेले सत्तांतर आपल्याला माहितच आहे. शिंदेनी भाजपला हाताशी धरून सत्ता स्थापन केली खरी या युतीमुळे भाजप-शिंदे गटाला लोकसभा निवडणुकीत मोठा धक्का बसणार असल्याचा अंदाज इंडिया टुडे- सी व्होटरच्या सर्व्हेत वर्तविण्यात आला आहे. महाराष्ट्रात एकूण ४८ खासदार आहेत. २०१९चा लोकसभेचा निकाल पाहिला तर भाजप २३, शिवसेना १८, राष्ट्रवादी ५, काँग्रेस एक आणि एमआयएमचा एक असे खासदार विजयी झाले होते. शिवसेना-भाजप युतीने ४१ तर काँग्रेस-राष्ट्रवादीने ६ खासदार जिंकले होते. आता शिवसेनेचे १२ खासदार शिंदे गटात गेले. तर सहा खासदार ठाकरे गटात आहेत.
या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुका झाल्या तर शिंदे-भाजप गटाला फक्त १८ जागा मिळतील असा अंदाज सर्वेत करण्यात आलेला आहे.या दोन्ही गटाच्या खासदारांची संख्या ३५ आहे. मात्र सर्व्हेनुसार केवळ १८ खासदार विजयी होऊ शकतील. तर शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस यांनी एकत्र निवडणूक लढवल्यास मात्र त्यांना ३० जागा जिंकू शकतात असा अंदाज सर्व्हेत व्यक्त करण्यात आलाय.
२०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी याचा प्रभाव होता. अगदी २०१९मध्ये ही तो कायम राहीला. एनडीएकचे जास्तीजास्त खासदार निवडणून आले पण महाराष्ट्रातील सत्तानाट्यानंतर जर आज लोकसभा निवडणुक झाली तर भाजपासाठी धक्कादायक चित्र असेल असे लोकांचे म्हणणे आहे.