ठाकरेंना शिंदे गटाचे निमंत्रण फक्त १ अट !

शिवसेनेला पुन्हा उभारी देण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे जीवाचे रान करताना दिसत आहे. शिवसंवाद यात्रा, महाराष्ट्र दौरा सुरु असून शिवसैनिकांना नवचैतन्य देण्याचे काम सुरु आहे. बंडखोरांच्या मतदार संघात जावून आदित्य ठाकरे सभा घेत असून गद्दा, विश्वासघातकी अशा भाषेत टीका करत आहेत.
तर शिंदे गटाने एक कलमी कार्यक्रम हाती घेतलाय असे दिसतेय.तो कार्यक्रम म्हणजे ठाकरे यांनी हकालपट्टी केलेल्या आणि ठाकरेंना सोडून येणाऱ्यांना शिंदे गट आपल्याकडे सामावून घेतो आहे. यामुळे ठाकरेंचे पदाधिकारी आणि गटप्रमुख शिंदे गटात जाण्याचा ओघ वाढलेला पहायला मिळतोय. हे सगळं होत असताना आदित्य ठाकरे अजूनही आशा बाळगून आहेत की जे लोक शिवसेनेला सोडून गेलेले आहेत ते पुन्हा परत येतील. शिंदेंसोबत गेलेल्यांसाठी मातोश्रीचे दरवाजे खुले आहेत असे आदित्य ठाकरेंनी वारंवार बोलून देखील दाखवले आहे.
आता तर शिंदे गटाने थेट उद्धव ठाकरे यांना निमंत्रण दिल्याचं बोलल जातंय. शिंदेसोबत गेलेले खासदार राहुल शेवाळे यांनी एक मोठं विधान केलंय. उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडले आणि त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीची साथ सोडली तर आम्ही त्यांचे स्वागत करू. महाविकास आघाडीतून बाहेर पडलो असे त्यांनी जाहीर करावं. तसं झालं तर शिवाजी पार्क वरून बाळासाहेब ठाकरे यांचेच विचार प्रगट होतील आणि तो संदेश शिवसैनिकांमध्ये जाईल आणि ठाकरे या भूमिकेचं आम्ही स्वागत करु असे राहुव शेवाळे यांनी म्हटलंय
ज्यांच्यासोबत युती केली म्हणून शिवसेनेला एवढं मोठ भगदाड पडलं तरीसुद्धा उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची साथ सोडलेली नाही. तेव्हा आता राहुल शेवाळेंच्या आवाहनाला ठाकरे कितपत प्रतिसाद देतील ते पहावं लागेल.