आता WhatsApp वरून चेक करा Live Train Status आणि PNR, पाहा पूर्ण प्रोसेस

रेल्वेने लांबचा प्रवास करताना रेल्वेचा लाइव्ह स्टेट्स आणि पीएनआर संबंधी तुम्हाला माहिती हवी असेल तर ते काम आता खूप सोपे झालेले आहे. कारण आता ही माहिती तुम्हाल थेट WhatsApp वरून मिळू शकणार आहे. आता तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे तर यासाठी काही स्टेप्स तुम्हाला फॉलो करायला हव्यात. 

IRCTC कडूनच रेल्वे प्रवाशांसाठी एक नवीन सुविधा आणण्यात आलेली आहे. या मदतीने प्रवासी इंस्टेंट मेसेजिंग ॲप व्हॉट्सॲप वरून रेल्वेचा लाइव्ह स्टेट्स आणि पीएनआर चेक करू शकतात. हे नवं फीचर मुंबई बेस्ड स्टार्ट अप Railofy ने आणलं असून आता प्रवाशांना थेट व्हॉट्सॲपवरून प्रवाशांना सर्व माहिती मिळवण्याची सुविधा दिली जाणार आहे.

WhatsApp चॅटबोटकडून भारतीय रेल्वेच्या पॅसेंजरसाठी PNR Status ची माहिती देते. याच्या मदतीने एक स्टेशन आधी, अपकमिंग स्टेशन, आणि अन्य ट्रेनची डिटेल्स मिळवता येवू शकते. यासाठी तुम्हाला सिंपल १० अंकाचा PNR नंबर WhatsApp Chatbot वर टाकावा लागेल. यानंतर तुम्हाला सर्व माहिती मिळेल. लाइव्ह ट्रेनचे स्टेट्स चेक करण्यासाठी Railofy चा WhatsApp Chatbot नंबर +91-9881193322 तुमच्या फोनमध्ये सेव्ह करा. तुमच्या फोनमध्ये WhatsApp ॲप्लिकेशन अपडेट करून कॉन्टॅक्ट लिस्ट रिफ्रेश करा. पुन्हा Railofy चॅट विंडोला सर्च करून ओपन करा. यानंतर तुम्हाला १० डिजिट PNT नंबरला WhatsApp Chatbot वर टाकावा लागेल. Railofy chatbot तुम्हाला ट्रेनच्या रियल टाइम अलर्ट आणि डिटेल पाठवले जाईल. याच प्रकारे तुम्हाला सर्वात आधी PNR नंबर पाठवून लाइव्ह अपडेट आणि अलर्ट मिळू शकतात.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.