ठाकरेंनी थेट वजीर बदलला? नार्वेकरांना ‘या’ गोष्टी भोवल्या?

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेत उभी फूट पडली अगदी राज्यात सत्तांतर झालं. आमदारा, खासदार, गटप्रमुख एक एक करत अनेकांनी ठाकरे यांची साथ सोडली त्यामुळे ठाकरेंचा कठिण काळ सुरु आहे असे म्हटले जावू लागले. अगदी भाजप नेते सुद्धा ठाकरेंना आपला नंबर एकचा शत्रू मानू लागले आहेत. या सगळ्यात एक चर्चा समोर येते आहे ती म्हणजे उद्धव ठाकरे यांनी आपला वजीर बदलला आहे. अनेक वर्षे उद्धव ठाकरे यांचे राईट हँण्ड असणारे मिलींद नार्वेकर आता ठाकरेंपासून काहीसे दुरावले आहेत अशी चर्चा आहे. आता ही चर्चा का सुरु झाली त्यामागे अनेक कारणे आहेत त्याचबरोबर ठाकरेंसोबत एका नव्या नावाची चर्चा सुरु झाली आहे.
उद्धव ठाकरे यांच्यासोबतच काय पण शिवसेना मेळावा झाला त्यावेळी सुद्धा एक व्यक्ती ठाकरेंसोबत फाईल घेवून फिरताना दिसली ते होते रवी म्हात्रे . खरं तर शिवसेना भवनात रवी म्हात्रे यांचा वावर सतत वाढलेला आहे याबद्दल कुजबूज सुरुच होती. रवी म्हात्रे सतत ठाकरेंसोबत त्यांच्या सहायकाच्य भूमिकेत दिसू लागले आहेत त्यामुळे चर्चांना उधाण आलेला आहे. मिलींद नार्वेकर यांची जागा रवी म्हात्रे यांनी घेतली का अशी चर्चा सुरु आहे. उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मिलींद नार्वेकर यांच्या माध्यमातून जावं लागत होतं आता रवी म्हात्रे त्या भूमिकेत गेलेत का अशी विचारणा होते आहे. खरंतर बाळासाहेबांच्या काळापासून रवी म्हात्रे कार्यकरत होते पण नंतर काही काळ म्हात्रे ऍक्टीव्ह मोडमध्ये नव्हते. शिंदेंच्या बंडानंतर ते ऍक्टीव्ह मोडमध्ये दिसले.
आता मिलींद नार्वेकर आणि उद्धव ठाकरे यांच्यात दुरावा का निर्माण झाला कारण शिंदे यांनी नार्वेकर यांच्यात भेटीगाठी वाढल्या. गणेशोत्सवाच्या काळात शिंदे नार्वेकर यांच्या घरी गणपतीसाठी गेले होते. एवढच नाही कर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील नार्वेकरांच्या घरी हजेरी लावली. नार्वेकर यांच्या सोबत मुख्यमंत्री शिंदे मनोहर जोशी यांच्या घरी दिसले होते. बंडखोरीच्या काळात ठाकरेंनी मिलींद नार्वेकर यांच्यावर बंड थोपवण्याची जबाबदारी दिली होती. पण तिथेही नार्वेकर ठाकरेंसाठी संकटमोचक ठरू शकले नाहीत. मध्यंतरी ठाकेरंवर जेव्हा टीका झाली तेव्हा त्यांच्या सोबत असणाऱ्या बडव्यांवर ताशेरे ओढण्यात आले त्यात नार्वेकर होते. नार्वेकर हे उद्धव ठाकरेंपर्यंत पोहचू देत नाहीत असा रोष शिवसैनिकांमध्येच आहे. त्यामुळे ठाकरेंनी नार्वेकरांना रिप्लेस केले का अशी चर्चा रंगलेली आहे. याबद्दल शिवसेनेकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही सोशल मीडियावर अशा चर्चा रंगलेल्या आहेत आता येणाऱ्या काळात यावर काय माहिती येते ते पहावे लागेल.