सध्या मुख्यमंत्री, शपथविधी, नाराज, टीका, या सगळ्या बातम्यांचा ओव्हर डोस झाला आहे. राजकारणाच्या याच बातम्यांच्या भडिमारात राजकारणाच्या बाहेर असलेल्या मोठ्या जगात नुकतीच भारतीयांसाठी अतिशय अभिमानास्पद व अतिशय महत्त्वाची अशी घटना घडली आहे. नुकतेच इस्त्रोने proba 3 या मोहिमेचे प्रक्षेपण केले आहे आणि याच मोहिमेबद्दल जाणून घेऊयात या व्हिडिओ मधून.
आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून युरोपियन स्पेस एजन्सीच्या PROBA-3 मोहिमेचे प्रक्षेपण झाले आहे. यासाठी PSLV-C59 यानाची मदत घेतली गेली. जे 550 किलो वजनाच्या उपग्रहांसह उड्डाण करेल. PROBA-3 ही इन-ऑर्बिटल प्रात्यक्षिक मोहीम असून ५ डिसेंबरला सायंकाळी 4 वाजून 6 मिनिटांनी उपग्रहाचे प्रक्षेपण केले गेले.
SRO चे PROBA-3 मिशन हा युरोपमधील अनेक देशांचा भागीदारी प्रकल्प आहे. यामध्ये स्पेन, पोलंड, बेल्जियम, इटली आणि स्वित्झर्लंड या देशांचा समावेश आहे. या मोहिमेची किंमत अंदाजे 200 मिलियन युरो आहे. प्रोबा-3 मिशन सुमारे 2 वर्षे चालणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या मोहिमेची विशेष बाब म्हणजे या मोहिमेच्या मदतीने अंतराळात ‘प्रिसिजन फॉर्मेशन फ्लाइंग’ची चाचणी घेण्याची तयारी सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत दोन उपग्रह एकत्र अवकाशात उड्डाण करतील.ISRO ची व्यावसायिक शाखा New Space India Limited या मोहिमेत सहकार्य करत असून इस्रोने यापूर्वी दोन प्रोबा मोहिमा सुरू केल्या आहेत. ज्यातील पहिले PROBA-1 चे प्रक्षेपण 2001 मध्ये केले होते, तर दुसरे PROBA-2 मिशन 2009 मध्ये लॉन्च करण्यात आले होते. या दोन्ही मोहिमांमध्ये इस्रोला यश आले. व ५ डिसेंबरला यातील प्रोबा ३ चे प्रक्षेपण करण्यात आले आहे.
……………..
proba ३ या मोहिमेत दोन अंतराळयानांचा समावेश आहे. कोरोनाग्राफ स्पेसक्राफ्ट आणि ऑकल्टर स्पेसक्राफ्ट अशी त्यांची नावे आहेत. ते ‘स्टॅक्ड अर्थात एकावर एक अश्या कॉन्फिगरेशन’ मध्ये लाँच केले आहेत. PROBA-3 ही जगातील पहिली अचूक उड्डाण मोहीम आहे. यात सूर्याच्या वातावरणातील सर्वात बाहेरील आणि उष्ण थर म्हणजेच कोरोनाचा अभ्यास केला जाणार आहे. त्यामुळे पहिल्यांदाच सूर्याला जवळून पाहता येणार आहे.
सूर्याच्या कोरोनाचा अभ्यास, दुहेरी-उपग्रह तंत्रज्ञान वापर, कृत्रिम सूर्यग्रहणाची निर्मिती या दृष्टीने हि मोहीम अतिशय महत्वाची असून भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) या मोहिमेसाठी आपले विश्वासार्ह PSLV-XL रॉकेट वापरत आहे. या मोहिमेच्या यशामुळे ISRO चे जागतिक स्तरावर योगदान आणि तांत्रिक सामर्थ्य अधोरेखित होईल. प्रोबा-3 मोहिम ही एक क्रांतिकारी पायरी असून, अंतराळ विज्ञानात भारताला नवीन दिशा देणारी ठरेल. यामुळे अंतराळ संशोधनातील आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि नवनवीन तंत्रज्ञानाचा विकास याला मोठी चालना मिळेल. तर यावर तुमचे मत काय ते कंमेंट करून नक्की सांगा…