टायगर- दिशाच्या ब्रेकअपवर जॅकी श्रॉफ म्हणाले….

दिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ यांचे ब्रेकअप झाल्याच्या चर्चा सोशल मीडियावर होत आहेत. हे दोघे सहा वर्षे रिलेशनशीपमध्ये होते पण अचानक या दोघांच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण झाल्याचं बोलल जातंय.बॉलीवूडच्या अनेक पार्ट्यांमध्ये दीशा आणि टायगर यांना एकत्र बघितलं जात होतं पण आता यांच्या ब्रेकअपच्या बातम्या येत आहेत. या संदर्भात टायगरटे वडिल अभिनेता जॅकी श्रॉफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
एका वर्तमानपत्राच्या प्रतिनिधीशी बोलताना जॅकी श्रॉफ म्हणालेत, ‘ते दोघे एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत.मी त्या दोघांना एकमेकांसोबत टाईम स्पेंड करताना पाहिलेले आहेत. दोघेही पार्टीला एकत्र जातात. कामाव्यतिरिक्त ते एकमेकांना वेळ देतात. मी माझ्या मुलाच्या पर्सनल लाईफमध्ये विशेष करून त्याच्या लव्ह लाईफमध्ये हस्तक्षेप करत नाही. त्याची प्रायव्हसी डिस्टर्ब करणे मला अजिबात आवडणार नाही. ते दोघे आजही एकमेकांचे चांगले मित्र आहेत.’
जॅकी श्रॉफ पुढे म्हणाले, ‘हे त्या दोघांचं खासगी आयुष्य आहे. ते दोघे स्वतः निर्णय घेवू शकतात. त्यांनी एकत्र रहायचे की नाही हे त्या दोघांनी ठरवायला हवे. ही त्यांची लव्ह स्टोरी आहे. आमचं दिशाबरोबर चांगलं बॉन्डिंग आहे.’ दिशा आणि टायगरने २०२२च्या सुरुवातीपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता असे ही बोलेल जाते आहे. एकूणच या दोघांच्या ब्रेकअपबद्दल अजून कोणाचीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही.