जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणी वाढल्या, म्हणाली….

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणीत वाढ होताना दिसते आहे. 215 कोटींच्या वसुलीच्या प्रकरणात ईडीने जॅकलिनवर आरोपपत्र दाखल केले आहे. जॅकलिनला वसुली रकमेचा फायदा झालेला आहे असा आरोपपत्राच करण्यात आलेला आहे. सुकेश हा गुन्हेगार होता हे जॅकलिन माहित होते. जॅकलिन जरी म्हणत असली ती सुकेशला ओळखत नाही तरी त्या दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत. दरम्यान जॅकलिन फर्नांडिसने एक पोस्ट शेअर केली आहे.
जॅकलिनने त्या पोस्टमध्ये असे म्हटले आहे की प्रिय, जगात ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्यासाठी मी पात्र आहे. मी स्वतःला स्विकारलं असून, मी ताकदवरसुद्धा आहे. मी मजबूत आहे आणि लवकरच सर्व काही ठिक होणार आहे. मी सर्व काही करु शकते आणि माझी सर्व स्वप्ने मी पूर्ण करेन. जॅकलिनच्या पोस्टची चर्चा होते आहे कारण तीने ही पोस्ट का लिहीली ते स्पष्ट केलेलं नाही. ईडी आणि सुकेश प्रकरणावर जॅकलिन मौन धारण केलेले आहे.
जॅकलिनचे सुकेश चंद्रशेखरसोबतचे कनेक्शन समोर आल्यापासून तिच्या कायदेशीर अडचणी वाढलेल्या आहेत. आतातर ईडीने तिच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. सुकेश गुन्हेगार असून तो तिहार जेलमध्ये आहे. तरी त्याच्याकडून जॅकलिनने भेटवस्तू घेतल्या. सुकेशने जॅकलिनला लाखोंच्या भेटवस्तू दिलेल्या आहेत. त्यात ९ लाखांची मांजर तर ५२ लाखांचा घोडा यांचा समावेश आहे. जॅकलिनच्या अडचणीत वाढ होत असताना तिचे बिग सिनेमा येणार आहेत. अक्षय कुमारसोबत ‘राम सेतू’मध्ये तर रोहित शेट्टीच्या ‘सर्कस’ चित्रपटातही ती दिसणार