‘जय भीम’ सिनेमा पुन्हा चर्चेत कारण…….

OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेला जय भीम सिनेमा आपल्याला आठवत असेल. प्रेक्षकांसह समिक्षकांनी या सिनेमाला चांगलीच पसंती दिली होती. तामिळनाडूमधील सत्यघटनेवर आधारीत हा सिनेमा होता. आता जय भीम सिनेमाची पुन्हा चर्चा होते आहे. कारण या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्मात्यांविरोधात तमिळनाडूमधल्या एका व्यक्तीने फसवणूकीचा खटला दाखल केलाय.
तक्रार दाखल करणाऱ्या व्यक्तीचे नाव व्ही कुल्नजीप्पन असून दिग्दर्शक ग्नानवेल आणि निर्मात्यांविरोधात कॉपीराईट कायदा कलम ६३ (ए) अंतर्गत तक्रार दाखल केली आहे. जय भीममधील कथा व्ही कुल्नजीप्पन यांच्या जीवनावर आधारीत आहे असा त्यांचा दावा आहे. २०१९ मध्ये ग्नानवेल आणि त्यांचे सहकारी मला भेटले होते. त्यांनी माझ्याकडे असलेली माहिती मिळवली. ५० लाख मानधन आणि नफ्यातील वाटा देण्याचे वचन दिले होते’ अशी माहितीसुद्धा कुल्नजीप्पनच्या तक्रारपत्रातून दिली आहे. ‘जय भीम’ चित्रपटामध्ये सूर्याने अॅड. चंद्रू ही व्यक्तिरेखा साकारली आहे. सूर्यासह सेनगानी आणि राजाकन्नू हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत.