काहीच न करता ही व्यक्ती कमवते लाखो रुपये, कसे काय?

कष्ट केल्याशिवाय पैसे मिळत नाही असं आपल्याला शिकविण्यात आलेले आहे. मेहनत केली तरच पैसे मिळतील असे सांगितले जाते पण तुम्हाला माहित आहे का जपानमध्ये अशी एक व्यक्ती आहे जी काहीही काम करत नाही पण तिची कमाई आहे लाखोंमध्ये… तुम्ही म्हणाल काहीतरी गंमत करत आहात तर तसं नाही. आम्ही जे सागंतो आहोत ते अगदी खरे आहे. आम्ही बोलतो आहोत Shoji Morimoto याच्याबद्दल याला काहीही न करता दर तासाला 5 हजार रुपये मिळतात, विश्वास बसत नाही पण हे खरे आहे.
जपानमधील टोकियो येथे राहणारा शोजी मोरिमोटोची दररोज ₹5,679 (10,000 येन) प्रति तास कमावतो. पण यासाठी तो कोणते काम करतो? असे विचारले असता उत्तर मिळेल ‘काहीच नाही’. अगदी बरोबर आहे कारण शोजी जे करतो ते जवळजवळ काहीही न करण्याच्या बरोबर आहे. तुम्हाला माहित आहे लोकं शोजीला पैसे का देतात त्याला लोकांसोबत राहण्याचे पैसे मिळतात. म्हणजेच आपल्यासोबत कुठेतरी चलण्यासाठी किंवा फक्त आपल्यासोबत बसून राहण्यासाठी लोक शोजीला तासाच्या हिशोबाने पैसे देतात. यामध्ये शोजीला फक्त त्या लोकांसोबत जावे लागते आणि काहीही करायचे नसते. शोजीचा दावा आहे की, त्याने गेल्या चार वर्षांत अशी सुमारे 4,000 सेशन्स केली आहेत. त्याच्या एका क्लायंटने तर त्याला सुमारे 270 वेळा बोलावले होते.
शोजीला पत्नी आणि मुलं असून त्यांचा उदरनिर्वाह याकामाद्वारे शोजी करत असतो. शोजीने रॉयटर्सला सांगितले की, तो स्वतःची वेळ आणि साथ भाड्याने देतो. त्याचे काम फक्त त्याच्या क्लायंटसोबत राहणे हे आहे. कोणी त्याला आपल्यासोबत गेम पार्कमध्ये घेऊन जातं, कोणी त्याला आपल्यासोबत ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी घेऊन जातं.
शोजी फक्त लोकांसोबत जातो तो कोणते काम करत नाही म्हणजे एकाने शोजीला रेफ्रिजरेटर उचलण्यास सांगितले तेव्हा त्याने नकार दिला. एकदा त्याला क्लायंटने कंबोडियाला बोलावले त्याने नाही सांगितले. शोजी कोणतेही सेक्स वर्क करत नाही. शोजीला त्याचे बरेचसे काम सोशल मीडियाद्वारे मिळते. तुम्हाला ऐकून आर्श्चय वाटेल ट्विटरवर त्याचे अडीच लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.
जपानची लोकसंख्या 37 मिलियनहून अधिक आहे, परंतु येथील बहुतेक शहरांमध्ये लोक आपल्या कामात व्यस्त आहेत. त्यांच्याकडे त्यांच्या प्रियजनांसाठी वेळ नाही. यामुळे लाखो-कोटी लोकांना एकटे राहावे लागतेय. अशा लोकांना कधी कधी अनेक ठिकाणी कोणाचीतरी सोबत हवी असते. लोकांची हीच गरज लक्षात घेत मोरिमोटोने 2018 मध्ये हा अनोखा बिजनेस सुरू केला आणि हळूहळू त्याची लोकप्रियता वाढली.