जॉन्सन अँड जॉन्सन उत्पादन वापरता मग ही बातमी नक्की वाचा !

नवजात बाळाला कोणता साबण किंवा पावडर लावायची असा प्रश्न जर विचारला तर आपल्या देशात एकच नाव समोर यायचं ते म्हणजे जॉन्सन अँड जॉन्सन. एक काळ होता जेव्हा जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीचा दबदबा जगभरात होता. मात्र आता आपल्याला जॉन्सन बेबी पावडर कुठेच दिसणार नाही, कारण कंपनीने बेबी पावडर प्रॉडक्टची विक्री पुढच्या वर्षी २०२३ पासून बंद करणार आहे.युके आणि कॅनडात तर २०२० पासूनच बेबी पावडरची विक्री बंद करण्यात आली होती. 

जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीविरोधात ३८,००० याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. कारण या पावडरचा वापर केल्यामुळे ओवरियान नावाचा कॅन्सर होण्याचा धोका आहे असा दावा करण्यात आला होता. अनेक ग्राहक कंपनीविरोधात कोर्टात गेले आणि कंपनीला हजारो कोटींचा दंड भरावा लागला. प्रत्येकवेळी कंपनीने आरोप फेटाळले पण यामुळे कंपनीच्या विक्रीवर याचा मोठा परीणाम झाला. अखेर जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीने  उत्पादनाची विक्री बंद करण्याची घोषणा केली आहे.

जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीविरोधात अमेरिकन कोर्टात २२ याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. यात कोर्टाने कंपनीविरोधात निकाल देत जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीला दंड ठोठावला होता. यात कंपनीला 200 कोटी डॉलरचा दंड द्यावा लागला होता. 

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.