कल्याण-डोंबिवली मतदारसंघावर भाजपचा डोळा?

भाजपने आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मिशन महाराष्ट्र सुरु केलंय त्याचबरोबर ज्या मतदारसंघात भाजप उमेदवार विजयी झालेले नाहीत अशा ठिकाणी भाजप ताकद वाढवण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करणार आहे. भाजपने शत प्रतिशद भारत मिशनसुरु केलं असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघांमध्ये केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर दौरा करणार आहेत. पुढील पंधरा महिन्यात हे दौरे होणार आहेत.तळागाळात भाजपची ताकद वाढवण्याचा प्रयत्न यातून करण्यात येणार आहे. 

तळागाळातील भाजप कार्यकर्ते आमदार पदाधिकारी यांच्याशी थेट संवाद हे केंद्रीय मंत्री दौऱ्यादरम्यान साधणार आहेत. आता मोठा प्रश्न असा आहे की  अनुराग ठाकूर जेव्हा कल्याण लोकसभा मतदार संघाचा दौरा करतील तेव्हा कल्याण नेमकं कोणाचं ? असा प्रश्न सुद्धा उपस्थित होतोय. प्रत्येक पक्षाला ताकद वाढवण्याचा अधिकार आहे मात्र पक्षाची ताकद वाढवत असताना या मतदारसंघांमध्ये भाजप उमेदवार सुद्धा देणार का ?भाजपसोबत शिंदे गट सत्तेत आहे, असं असताना शिंदे गटाच्या खासदाराच्या आणि खास करून मुख्यमंत्र्यांच्या पुत्राच्या मतदारसंघात जेव्हा भाजप अशा प्रकारचे दौऱ्यांचे नियोजन करून ताकद वाढवतोय तेव्हा या मिशनचं शिंदे गट समर्थन कसं काय करतंय अशी चर्चा रंगलेली आहे. 

आता पक्षाची ताकद वाढविणे, संघटनात्मक बांधणी करणे हा प्रत्येक पक्षाचा अधिकार आहे. मात्र ही ताकद जेव्हा मित्र पक्षाच्या  मतदारसंघात केली जातेय. केंद्रातला मंत्री येवून दौरा करणार आहे तेव्हा चर्चा तर होणारच ना….दरम्यान पक्षाची ताकद वाढवताना दोन्ही गटाकडून सामंजस्याने प्रश्न सोडवले जातील हीच अपेक्षा आहे. 

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.