PS 1 Row: ‘त्यावेळी हिंदू धर्मच नव्हता’! कमल हासन आऊट ऑफ कंट्रोल !

टॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेता कमल हासन जसे त्यांच्या अभिनयामुळे चर्चेत असतात त्याचप्रमाणे त्यांच्या वक्तव्यावर नेहमीच चर्चा होत असते. पोन्नियन सेल्वन अर्थात पीएस 1 या सिनेमावर कमल हसन यांनी दिलेली प्रतिक्रिया ऐकून सगळ्यांना धक्काच बसलेला आहे. दिग्दर्शक मणिरत्नम यांनी हासन यांना खास स्क्रिनिंगसाठी निमंत्रित केले होते. हा सिनेमा पाहिल्यानंतर कमल हासन म्हणाले, राजराजा चोलनच्या काळात हिंदू धर्म नावाची कोणतीही गोष्ट नव्हती. त्या चित्रपटामध्ये जे काही दाखवण्यात आले आहे ते न पटणारे आहे.

पोन्नियन सेल्वन 1 च्या खास स्क्रिनिंग दरम्यान हासन यांनी असे वक्तव्य करत निर्माता आणि दिग्दर्शकावर बोचरी टीका केली आहे. आता सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा होते आहे. पोन्नियन सेल्वनमध्ये राजराजा चौळ याला हिंदू म्हणून सादर करण्यात आले आहे. आता त्यावेळी धर्म नावाची गोष्ट अस्तित्वात होती का हा खरा प्रश्न आहे. मला तरी असे वाटते हे सगळे शब्द त्याकाळात इंग्रजांनी त्यांच्या सोयीसाठी वापरले आणि आपल्यावर देखील अजुनही त्याच गोष्टींचा पगडा आहे. आपण त्याला फॉलो करतो. हासन यांच्या प्रतिक्रियेनंतर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.