Emergency चित्रपटातील अनुपम खेर यांचा लूक रिलीज

कंगनाचा बहुचर्चित सिनेमा इमरजंसी (Emergency) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सिनेमाचा टीझर रिलीज करण्यात आला त्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. इमरजंसी सिनेमात कंगनाने इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे. टीझर नंतर आता इमरजंसी चित्रपटातील एक एक व्यक्तीमत्वाचा लूक जारी करण्यात येतो आहे. अभिनेते अनुपम खेर यांचा इमरजंसीमधील लूक आज रिव्हील करण्यात आला आहे.
अभिनेते अनुपम खेर यांनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून इमरजंसी चित्रपटातील त्यांचा लूक शेअर केला आहे. इमरजंसीमध्ये अनुपम खेर जय प्रकाश नारायण यांची भूमिका साकारत आहेत. अनुपम खेर यांचा हा लूक पाहिल्यानंतर आता चाहते या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत.हा फोटो शेअर करुन अनुपम खेर यांनी एक कॅप्शन लिहीली आहे त्यात, ‘कंगनाने दिग्दर्शित केलेल्या इमरजंसी या चित्रपटामध्ये जय प्रकाश नारायण यांची भूमिका साकारताना अभिनमान आणि आनंद वाटतो आहे. जय हो ! असे म्हटले आहे.
जेव्हा इमरजंसी सिनेमाचा टीझर रिलीज झाला तेव्हा या टीझरने सगळ्यांचे लक्ष वेधले. कंगनाने हा टीझर शेअर करुन ‘Presenting ‘Her’who was called ‘Sir’ अशी कॅप्शन त्याला दिली होती. इमरजंसी चित्रपटाचे दिग्दर्शन, कथा लेखन आणि निर्मिती कंगनाची आहे. तर स्क्रिनप्ले आणि संवाद लेखन रितेश शाह यांनी केलेले आहे. आता चित्रपटातील अनेक व्यक्तीरेखांचे लूक कधी रिलीज होतात याची प्रेक्षक वाट पाहत आहेत.