‘कार्तिक आर्यन’ने ठेवला आदर्श !!

अभिनेता कार्तिक आर्यन बॉलिवूडचा एक गुणी कलाकार तर आहेच परंतु तो उत्तम आणि संवेदनशील व्यक्तीदेखील आहे. सगळ्यांसाठी त्याने एक आदर्श घालून दिलाय.एकीकडे बॉलिवूडमधील खान, देवगण पैशांसाठी पान मसाल्याच्या जाहिराती करताना, कार्तिकने मात्र पान मसल्याची जाहिरात करण्यास नकार दिला. वास्तविक ही जाहिरात करण्यासाठी त्याला काही कोटी रुपये मिळत होते. परंतु तरीदेखील त्यानं ही जाहिरात केली नाही. कार्तिकनं घेतलेल्या या निर्णयाचं भरभरून कौतुक केलं जातंय.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कार्तिक आर्यनचा ‘भूल भुलैया २’ हा सिनेमा सुपरडुपर हिट ठरला आहे. त्यामुळे त्याची लोकप्रियता ही खूप वाढली आहे. त्याच्या या लोकप्रियतेचा फायदा घेत एका पान मसाल्याच्या कंपनीनं त्याला घेऊन जाहिरात करण्याचा प्रस्ताव त्याच्याकडे मांडला. या जाहिरातीसाठी कार्तिकला ९ कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती. परंतु कार्तिकनं ही ऑफर सपेशल धुडकावून लावली. दरम्यान, याप्रकरणी कार्तिकनं अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.