केतकी चितळेला बिग बॉस मराठीची ऑफर ! कोणत्या सेलिब्रिटींनी दिला शोसाठी नकार?

बिग बॉस मराठी सिझन ४ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हिंदी प्रमाणे मराठी बिग बॉसचा एक मोठा चाहता वर्ग आहे त्यामुळे यावेळी कोणते पाहुणे बिग बॉसच्या घरी येणार याबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत. मराठीमधील वादग्रस्त अभिनेत्री म्हणजे केतकी चितळे, तिचे नाव बिग बॉसच्या यादीत होते अशी माहिती मिळाली होती पण तिने बिग बॉसा नकार दिला आहे. एका वृत्तपत्राला मुलाखत देताना केतकीने असे स्पष्ट केले आहे की ती अशा रिॲलिटी शोचा भाग होणे तिला पसंत नाही आणि ती त्यात सहभाग देखील घेणार नाही.
अभिनेत्री आणि ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या रिअॅलिटी शोची सूत्रसंचालक प्राजक्ता माळी तिला सुद्धा बिग बॉसकडून ऑफर आलेली आहे पण १०० दिवस एका घरात मी बंद राहू शकत नाही असे स्पष्ट प्राजक्ताने स्पष्ट केले आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ती बोलती होती.
मराठीमधी पहिली ट्रान्सजेंडर अभिनेत्री गंगालाही बिग बॉस मराठीने संपर्क केला होता पण त्यांनतर कोणतीही अपडेट आली नाही असे गंगाने सांगितले आहे. ‘लागिरं झालं जी’ फेम अभिनेत्री शिवानी बावकरलाही बिग बॉसच्या टीमने संपर्क केला होता पण बिग बॉसचा करार, अटी आणि नियम पाहून तिने नकार दिलाय असे समोर आले आहे. रात्रीस खेळ चाले ३’ मधून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरला मराठी बिग बॉसची ऑफर आली होती पण ती या शोसाठी जाणार नाही असे तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना सांगितले आहे.