किशोरी पेडणेकरांना कोणी दिली जीवे मारण्याची धमकी?

महाराष्ट्रात एकीकडे राजकीय उलथापालथ होत असताना दुसरीकडे मुंबईच्या महापौरी किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. एका पत्राद्वारे पेडणेकरांना ही धमकी आली असून या पत्रावर संबंधित व्यक्तीचं नाव, पत्ता देखील नमूद करण्यात आला आहे. या पत्राची आपण गांभीर्याने दखल घेतली असून त्यासंदर्भात तातडीने कार्यवाही करणार असल्याची प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींसोबतच आता या धमकी पत्राची देखील चर्चा सुरू झाली आहे.

काय आहे या पत्रामध्ये?

एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीनंतर त्यांच्यासोबत शिवसेना आणि अपक्ष मिळून ५० आमदार असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे सरकार अल्पमतात असताना किशोरी पेडणेकर यांना ही धमकी आली आहे. “मी विजेंद्र म्हात्रे.. जय महाराष्ट्र सायबर कॅफे, महाराष्ट्र बँक, उरणमधून बोलतोय. आत्ता लेखी लिहून पाठवतोय. सरकार पडू दे.. नंतर तुला जीवे मारू. ते पत्रही मीच पाठवलं होतं. तुला जे करायचं ते कर. उद्धव ठाकरेंना सांग”, असं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.