फक्त ५९ सेकंद, पाहिला का सलमानचा स्वॅग ?

बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानच्या आगामी ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाचा टीझर रिलीज झालाय. मोकळे लांब केस, डोळ्यांवर चष्मा, सिग्नेचर ब्रेसलेट, चकचकीत मोटारसायकल, लडाखच्या मैदानात सलमानची पहिलीच झलक हृदयाचा ठोका चुकवायला पुरेशी आहे. मात्र, 26 ऑगस्ट रोजी इंडस्ट्रीत 34 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सलमानने चित्रपटातील त्याचा लूक शेअर केला. पण या टीझर व्हिडिओने चाहत्यांना वेड लावले आहे. भाईजानचा स्वॅग असा आहे की 59 सेकंदांचा टीझर पाहून तुम्ही प्रेमात पडाल.
सुपरस्टार सलमान खानच्या या अॅक्शन एंटरटेनरची त्याचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. हा छोटा टीझर रिलीज होताच सलमानने चित्रपटाच्या शीर्षकाची घोषणा केली आहे. याआधी या चित्रपटाच्या शीर्षकाबद्दल अनेक शंका होत्या. आधी या चित्रपटाचे नाव ‘कभी ईद कभी दिवाली’ असे होते, नंतर बातमी आली की चित्रपटाचे नाव ‘भाईजान’ आहे. पण आता शॉर्ट टीझर रिलीज करून सलमानने चित्रपटाचे अंतिम नाव किसी का भाई किसी की जान असल्याचे सांगितले आहे
टीझरमध्ये सलमान क्रूझर मोटरसायकलवरून लडाखच्या मैदानी भागात फिरताना दिसत आहे. त्याचे लांबसडक विखुरलेले केस जोराच्या वाऱ्यात वेगळेच वातावरण निर्माण करत आहेत.