सिब्बलांचा तगडा युक्तीवाद, शिंदे गटाला पकडलं कोंडीत !

राज्यातील सत्ता संघर्षावर आता ८ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. दरम्यान आज सुप्रीम कोर्टात शिवसेनेची बाजू मांडताना सेनेचे वकील कपील सिब्बल यांनी जोरदार युक्तीवाद केला. ‘शिंदे गट जर म्हणत आहे आम्ही शिवसेना सोडलेली नाही तर मग शिंदे गट निवडणुक आयोगाकडे का गेला?’ असा प्रश्न उपस्थित करत सिब्बल यांनी शिंदे गटाला कोंडीत पकडले. 

सिब्बल यांनी शिंदे गटाचा दावा खोडून काढताना, ‘दोन तृतिआंश लोक पक्षावर दावा करु शकत नाहीत असे ही स्पष्ट केले. विधीमंडळात जरी शिंदे गटाला बहुमत असले तरी अख्खा पक्ष त्यांचा होवू शकत नाही.’ हे स्पष्ट करत असताना सिब्बल म्हणाले, ‘जर शिंदे गटाचा युक्तीवाद मान्य केला तर उद्या बहुमताच्या जोरावर सरकारे पाडली जातील, त्यामुळे दहाव्या अनुसुचीला कोणताही अर्थ उरणार नाही.’ सिब्बल यांनी आज सुप्रीम कोर्टात मुळ पक्ष काय असतो याची व्याख्यासुद्धा वाचून दाखवली. शिंदे गटाने आपला बंड मान्य केला आहे त्यामुळे भाजप किंवा इतर पक्षात विलीन होणे किंवा नवा पक्ष स्थापन करणे हाच पर्याय उरतो असेही सिब्बल यांनी सांगितले. 

दरम्यान नवा गट स्थापन झाला आहे का? अशी विचारणा कोर्टाने केली असता, ‘जे करायचे आहे ते निवडणूक आयोगाने करावे लागेल असे सिब्बल म्हणाले.पक्ष आणि निवडणूक चिन्हाचा निर्णय निवडणूक आयोग ठरवेल’ असेही सिब्बल यांनी सांगितले. एकूणच सिब्बल यांनी शिंदे गटाला आज सुप्रीम कोर्टाच चांगलेच कोंडीत पकडले होते. ‘सुप्रीम कोर्टानेही पक्षाच्या चिन्हासंदर्भात निवडणूक आयोगाने कोणताही निर्णय तुर्तास तरी घेऊ नये’ असं म्हटलं आहे. त्यामुळे आजच्या सुनावणीवर शिवसेनेला मोठा दिलासा मिळाल्याचे दिसून येते आहे. 

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.