कोल्हापुरात शिंदे गटाला धक्का !

संपूर्ण महाराष्ट्रात शिंदे गटाला जोरदार पाठिंबा मिळतो आहे.सत्ता मिळाल्यानंतर शिंदे गटाकडे येणाऱ्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची संख्या सतत वाढत होती. मात्र शिंदे गटाला कोल्हापुरात पहिला धक्का बसला आहे. कोल्हापूरचे माजी उपमहापौर दिगंबर फराकटे यांनी शिंदे गटाला जय महाराष्ट्र केला आहे. फराकटे यांनी १५ दिवसापूर्वीच शिंदे हटात प्रवेश केला होता. मात्र आता त्यांनी शिंदे गटातून बाहेर पडत माजी आमदार मालोरीराजे आणि काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्यासोबतच राहणार असल्याचं जाहीर केलंय.
फराकटे यांनी पत्रक काढत शिंदे गटातून बाहेर पडत असल्याचं सांगितलं. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या उपस्थितीत दिगंबर फराकटे यांनी एकनाथ शिंदेंच्या गटात प्रवेश केला होता.सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेनेचे १९ पैकू १२ खासदारही शिंदे गटात सामील झाले. आमदार-खासदारांनंतर शिवसेनेच्या जिल्हापातळीवरील पदाधिकाऱ्यांनीही मोठ्या प्रमाणावर शिंदे गटात प्रवेश केला. शिवसेना नेमकी उद्धव ठाकरेंची का एकनाथ शिंदेंची तसेच धनुष्यबाण कुणाचा याचा वाद निवडणूक आयोगाबरोबर सुप्रीम कोर्टात पोहचलाय.