क्रिती प्रभासला डेट करतेय ही चर्चा का सुरु झाली?

अभिनेत्री क्रिती सेनॉन नेहमीच सोशल मीडियावर ऍक्टीव असते. सध्या ती चर्चेत आली आहे आदिपुरुष या सिनेमामुळे. या सिनेमात क्रिती ही प्रभाससोबत काम करत असून ते दोघे एकमेकांना डेट करत आहेत अशी चर्चा रंगलेली आहे.
खरं तर यासाठी करण जोहरचा शो ‘कॉफी विथ करण 7’ हा सुद्धा काही प्रमाणात जबाबदार आहे कारण या कार्यक्रमात क्रितीने प्रभासला कॉल केला होता. तेव्हापासून क्रिती आणि प्रभासच्या अफेअरची सर्वत्र चर्चा होतेय. या नव्या हॉट कपलला एकत्र पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत. कृती आणि प्रभास ‘आदिपुरुष’ चित्रपटात एकत्र दिसणार आहेत.
आदिपुरुषच्या सेटवर क्रिती आणि प्रभासचे चांगले बॉन्डिंग पहायला मिळतेय. दोघेही एकमेकांशी गप्पा मारण्यात खूप व्यस्त आहेत. क्रिती आणि प्रभासची मैत्री खूप खास असल्याचं बोलले जातेय. हे दोघे एकमेकांना कॉल आणि मेसेज करत असतात. दोघांच्या मनात एकमेकांबद्दल स्ट्रॉंग फिलिंग आहे अशी सेटवर चर्चा रंगलेली आहे. आदिपुरुषमध्ये प्रभास हा रामची तर क्रिती ही सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. जानेवारी 2023 मध्ये हा सिनेमा रिलीज होतोय.