माझ्या SMS चं उत्तर दे…! Lalit Modi चं ट्विट व्हायरल

ललित मोदी याने गुरुवारी रात्री उशिरा बॉलिवूड अभिनेत्री आणि माजी मिस युनिव्हर्स सुष्मिता सेनला डेटची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केलं. ट्विटरवर सुष्मिता सेनला टॅग करत त्याने लिहिलंय, एक नवी सुरुवात, नवीन आयुष्य. जेव्हा त्याने हे लिहिलं तेव्हा लोकांना वाटले की, दोघांचं लग्न झालंय. मात्र ललितने स्पष्ट केलं की, ते आता फक्त डेट करत आहेत.

ललित मोदीने फक्त स्पष्टतेसाठी ट्विट केलं. लग्न केलं नाही, फक्त एकमेकांना डेट करतोय. मात्र तेही एक दिवस घडेल… ललित मोदीच्या पोस्टमध्ये सुष्मितासोबतचे काही काही खास फोटोही आहेत. मात्र, अभिनेत्रीने सोशल मीडियावर अशी कोणतीही पोस्ट केलेली नाही.

जुनं ट्विट व्हायरल

दरम्यान, दोघांमधील जुना संवाद सोशल मीडियावर व्हायरल झाला. एक जुनं ट्विट आहे ज्यामध्ये ललित आणि सुष्मिता आश्वासने आणि वचनबद्धतेबद्दल बोलत आहेत. ट्विटला उत्तर देताना ललितने सुष्मिताला त्याच्या एसएमएसचं उत्तर देण्यास सांगितले. हे ट्विट 2013 मधील आहे.

‘चांगल्या गोष्टींना वेळ लागतो’, ‘9 वर्षे वाट पाहिली’ असं म्हणत ट्विटवर चाहते प्रतिक्रिया देत आहेत. यावेळी एका यूजरने लिहिलं की, ‘अखेर 9 वर्षांनंतर रिप्लाय दिला.’

ललित मोदीचं यापूर्वी 1991 मध्ये लग्न झालं होतं. 17 ऑक्टोबर 1991 रोजी त्याने मीनलसोबत सात फेरे घेतले होते. डिसेंबर 2018 मध्ये मीनलचे कॅन्सरमुळे निधन झालं.

ललितने 2020 मध्ये लग्नाच्या वाढदिवसानिमित्त एक कोलाज शेअर केला आणि फोटोला कॅप्शन दिलं, 30 वर्षांपूर्वी आमचं लग्न झालं. मी तिला कोणत्याही गोष्टीपेक्षा जास्त मिस करतो. माझ्याकडे फक्त आमच्या सुंदर आठवणी आहेत. R.I.P #minalmodi तुझ्यावर कायम प्रेम करेन.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.