महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष, १ ऑगस्ट रोजी पुढील सुनावणी

राज्यात शिंदे गट आणि शिवसेनेत सुरु असलेला सत्तासंघर्ष मोठ्या खंडपीठ किंवा घटनापीठाकडे सोपवला जाण्याचे संकेत सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांनी बऱ्याच याचिका कोर्टात दाखल केल्या होत्या, त्यावर कोर्टाने सुनावणी केली. सुनावणीदरम्यान एकनाथ शिंदे यांची बाजू मांडताना ज्येष्ठ वकील हरिश साळवे यांनी वेळ वाढवून देण्याची मागणी केली होती, ज्यावर उद्धव ठाकरेंच्या वतीने अभिषेक मनू सिंघवी यांनी आक्षेप घेतला. सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीदरम्यान हे प्रकरण निकाल लावण्यासाठी खंडपीठाकडे वर्ग करण्याचा पर्याय होऊ शकतो म्हणून १ ऑगस्ट हे सुनावणीची पुढील तारीख असेल, हे सांगितलं.
शिंदे-ठाकरे गटाने २७ जुलैपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करावेत, असा हुकूम सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. सुनावणीच्या शेवटी शिवसेनेच्या वतीने पुढील सुनावणी होईपर्यंत परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश देण्याची विनंती केली. यासंदर्भात कोर्टाकडून तशाप्रकारचे आदेश आले असल्याचं शिवसेना खासदार अरविंद सावंत प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले.