PM मोदी, अदानींविरोधात खटला दाखल, वाचा नेमक काय झालं?

पंतप्रधान नरेंद्र मोदी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी आणि ज्येष्ठ उद्योगपती गौतम अदानी यांच्याविरोधात अमेरिकेत खटला दाखल करण्यात आलेला आहे. भ्रष्टाचार, पेगासस स्पायवेअरचा वापर आणि इतर मुद्द्यांवर हा खटला दाखल करण्यात आलेला आहे. अमेरिकेमधील कोलंबियाच्या जिल्हा न्यायालयाने या सर्वांविरुद्ध समन्स जारी केलेत.या प्रकरणात ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’चे अध्यक्ष आणि संस्थापक प्रोफेसर क्लॉस श्वाब यांच्या नावाचाही समावेश आहे.
भारतीय वंशाच्या अमेरिकन डॉक्टर लोकेश वुरुरू यांनी हा खटला दाखल केला असून ते मुळचे आंध्र प्रदेशातील आहेत. डॉक्टर लोकेश वुरुरू यांनी पंतप्रधान मोदी, रेड्डी, अदानी आणि इतर भ्रष्टाचारात गुंतल्याचा आरोप केलाय.ज्यात अमेरिकेत मोठ्या प्रमाणात रोख हस्तांतरण आणि राजकीय विरोधकांविरुद्ध पेगासस वापरण्याचा समावेश आहे. मात्र, या बाबत डॉक्टरने कोणताही पुरावा सादर केलेले नाही. 24 मे रोजी हा खटला दाखल करण्यात आला असून कोर्टाने 22 जुलै रोजी समन्स जारी केलेत ते 4 ऑगस्ट रोजी प्राप्त झालेत.न्यूयॉर्कमधील भारतीय-अमेरिकन वकील रवी बत्रा यांनी हा खटला पूर्णपणे निरर्थक असल्याचे म्हटले आहे.