शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी बातमी, ‘हे’ काम केलं, तरच मिळेल 50 हजारांचे अनुदान…!!

महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना-2021 अंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली आहे.. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान दिलं जाणार आहे. 2017-18-19-20 या वर्षांमध्ये कर्जाची परतफेड करणारे शेतकऱ्यांनाच हे अनुदान मिळणार आहे.

राज्य विधी मंडळाच्या पावसाळी अधिवशेनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना येत्या 15 सप्टेंबरपासून प्रोत्साहनपर अनुदानाची रक्कम देण्यास सुरुवात केली जाणार असल्याचे सांगितले होते. त्यासाठी 1 ते 5 सप्टेंबर दरम्यान अनुदानपात्र शेतकऱ्यांच्या नव्या याद्या बनवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.सप्टेंबर महिन्यात 50 हजारांच्या प्रोत्साहन अनुदानाचे वाटप केले जाणार आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात 50 हजार रुपयांचे अनुदान येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची यंदाची दिवाळी दणक्यात होणार निश्चीत आहे. 

मात्र शेतकऱ्यांना अनुदानाचे 50 हजार रुपये मिळण्यासाठी आजच (ता. 30) एक महत्वाचे काम करावे लागणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत आधार कार्ड (Aadhar) आपल्या बँक खात्याला लिंक (link) केलेले नाही, त्यांना हे अनुदान मिळण्यात अडचणी येणार आहेत. बॅंक खात्याला आधार लिंक करण्यासाठी शेतकऱ्यांना 30 ऑगस्ट 2022 पर्यंत अंतिम मुदत दिलेली आहे. सरकारच्या प्रोत्साहनपर अनुदान रक्कम मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना आजच आधार कार्ड बँक खात्याला लिंक करावे लागणार आहे. राज्यातील एकूण 14 लाख शेतकऱ्यांना या प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ होणार आहे

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.