लोकसभा 2024 ! भाजपची रणनीती ठरली, महाराष्ट्रातील 4 नेत्यांवर मोठी जबाबदारी

भाजपकडून लोकसभा निवडणुकीची जोरदार मोर्चेबांधणी सुरु झालीय.याचाच एक भाग म्हणून भाजपच्या संघटनात्मक नियुक्त्यांत महाराष्ट्रातल्या चार मुख्य नेत्यांना स्थान देण्यात आलंय. विनोद तावडे, प्रकाश जावडेकर, विजया रहाटकर, पंकजा मुंडे यांना राष्ट्रीय पातळीवर ही जबाबदारी सोपविण्यात आलीय.
भाजपाने केंद्रीय पातळीवर काही राज्यांच्या प्रभारी आणि सहप्रभारींची नियुक्ती जाहीर केलीय. यात महाराष्ट्रातील काही नेत्यांना मोठी जबाबदारी दिल्याचे पाहायला मिळाले. विनोद तावडे यांना बिहारच्या प्रभारीपदाची तर पंकजा मुंडे यांना मध्यप्रदेशात सहप्रभारीपदाची आहे.
डाव्यांचा गड मानल्या जाणाऱ्या केरळच्या प्रभारीपदाची जबाबदारी ही माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यावर सोपवण्यात आलीय.तर राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष विजया रहाटकर यांच्यावर भाजपने राजस्थानच्या सहप्रभारीपदाची धुरा दिलीय.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय संघटन महासचिव बीएल संतोष यांनी ६ सप्टेंबर रोजी देशातील १४४ लोकसभा मतदारसंघात भाजपची स्थिती मजबूत करण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांसोबत आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यासंदर्भातील रणनीतीही तयार करण्यात आली.