भाजपचं लोकसभेसाठी तगडं नियोजन !

विविध मुद्द्यांवरुनन देश आणि राज्यात राजकीय वातावरण तापलेलं असताना भाजपने मात्र लोकसभा २०२४ ची तयारी सुरु केलेली आहे. भाजपने २०२४ च्या लोकसभा निवडणुकिचे जबरदस्त प्लॅनिंग केले असून केंद्रीय मंत्र्यांकडे देशभरातील लोकसभा मतदारसंघांच्या जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या आहेत. 

केंद्र सरकाने केलेल्या योजना देशातील प्रत्येक जनतेपर्यंत पोहोचत आहेक की नाही हे पाहण्यासाठी ९ केंद्रीय मंत्री महाराष्ट्रातील १६ लोकसभा मतदारसंघाचा आढावा प्रत्यक्ष त्या मतदारसंघात जावून करणार आहेत. कार्यकर्त्यांबरोबर संवाद आणि पक्ष संघटनेवर भर दिली जाणार आहे. महाराष्ट्रातील १६ लोकसभा मतदार संघात ९ केंद्रीय मंत्री येणार आहेत. त्यांचा १८ महिन्यांचा प्रवास असेल. त्यात ६ वेळा केंद्रीय मंत्री महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असणार आहेत. प्रत्येक प्रवासात ३ दिवसांचा मुक्काम आहे आणि त्यात २१ कार्यक्रम होणार आहेत.

केंद्र सरकारच्या योजना खरंच गरजूंपर्यंत पोहोचत आहेत की नाही याची पाहणी केली जाणार आहे. तसेच स्थानिक पातळीवरील अडचणी, धार्मिक स्थळांना भेट, कार्यकर्त्यांबरोबर संवाद, पक्षीय बदल अशा कार्यक्रमांचा समावेश असणार आहे. सहकार क्षेत्रातील अग्रणी नेते, वकील, डॉक्टर,व्यापारी यांच्या वेगवेगळ्या बैठका, पत्रकार संवाद अगदी स्वस्त धान्याच्या दुकानात सुद्धा केंद्रीय मंत्री भेट देणार असल्याते सांगितले जाते आहे.कल्याण लोकसभेत आणि मध्य मुंबईमध्ये केंद्रीय मंत्री अनुरागसिंग ठाकूर, नारायण राणे हे दक्षिण मुंबई , पालघरमध्ये विश्वेश्वर तुडू, प्रल्हाद पटेल हे रायगड आणि शिर्डी मतदारसंघात , बारामतीला निर्मला सीतारमण, भूपेंद्र यादव यांच्याकडे औरंगाबाद आणि बुलढाणा लोकसभा मतदारसंघाची तर हरदीपसिंग पुरी यांच्यावर चंद्रपूरची जबाबदारी देण्यात आलेली आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीत पराभव झालेल्या १४१ जागांवर भाजपने लक्ष केंद्रित केलंय. २०१९ मध्ये भाजपचा १४ मतदारसंघांमध्ये पराभव झाला. या जागा जिंकण्यासाठी भाजपनं चार समूह तयार केले आहेत. यात प्रामुख्याने अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्याकडे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीला खिंडार पाडण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.