राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यावर भाजपाचा डोळा !

2024मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने जोरदार तयारी सुरु केली आहे. दक्षिणेकडील काही राज्य सोडली तर भाजपने देशात एक हाती वर्चस्व मिळवलेलं आहे. महाराष्ट्रात लोकसभेसाठी मिशन ४५ राबविण्याची तयारी भाजपने सुरु केली आहे. यात विशेष करुन भाजपने राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना घेरण्यासाठी खास रणनीती आखायला सुरुवात केली आहे. 

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन १६ ऑगस्टपासून बारामती लोकसभा मतदारसंघाच्या तीन दिवसीलय दौऱ्यावर आहेत. त्यामुळे भाजपने मिशन बारामीत हातात घेतलं आहे असे दिसून येते आहे. शरद पवार यांचे वर्चस्व असणाऱ्या बारामतीकडे भाजपने आपले लक्ष्य केंद्रीत केले आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर भाजपने आपले मिशन सुरु केले आहे. जिथे भाजप कधीच विजयी झालेले नाही तिथेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची रणनीती वापरली जाणार आहे. २०२४ चा महासंग्राम सुरु झाला असून भाजपचे मिशन म्हणजे अंतिम लढाईता नारा असेच म्हणावे लागेल. केंद्रीय मंत्र्याकडे प्रत्येकी चार मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली असून तीच रणनिती बारामती मतदारसंघात राबवली जाणार आहे.

पवारांचा बालेकिल्ला बारामतीने नेहमीच शरद पवार, अजित पवार यांना जिंकून दिलं आहे.तर सुप्रिया सुळे येथून खासदार आहेत. आता भाजपने आपला मोर्चा बारामतीकडे वळवला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्माला सीतारमन तीन दिवस बारमतीमध्ये राहणार आहेत.आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी याचं नियोजन केलंय. 

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.