आता या एक्झिट पोलस चा विचार करायचा झाल्यास यातील जवळपास सर्व एक्झिट पोलस हे महायुती सरकार राज्यामध्ये स्थापन होईल असा अंदाज वर्तवत आहेत, मात्र महाविकास आघाडी देखील त्यांना चांगलीच टक्कर देताना दिसते.
तर तिथेच यातील एक ते दोन एक्झिट पोलसच्या अंदाजानुसार राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊ शकत. मात्र या एक्झिट पोल्स मधून समोर आलेली सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ही निवडणूक एकतर्फी होणार नसून या निवडणुकीत महायुती व महाविकास आघाडी मध्ये संघर्षपूर्ण लढत पाहायला मिळणार आहे. तिथेच मनसे व इतर काही पक्ष अगदी हाताच्या बोटांवर मोजण्या इतक्याच जागा मिळवू शकतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.