अधिवेशनात कोण कोणावर बरसणार? अग्नीपरीक्षा कुणाची…?

पावसाळी अधिवेशन बुधवारपासून सुरु आहे. अनेक दिवस रखडलेले पावसाळी अधिवेशन सुरु होत असल्याने नेहमीप्रमाणे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जुंपणार यात शंकाच नाही. यंदाच्या पावसाळी अधिवेशात शिंदे-फडणवीस सरकार विरुद्ध ठाकरे गट, राष्ट्रवादी आणि काँग्रेस असे चित्र पहायला मिळणार आहे. नुकतेच शिंदे सरकारचे खातेवाटप झालेले आहे. या अधिवेशनात विरोधक जरी सत्ताधाऱ्यांवर तुटून पडणार असले तरी सत्ताधारी देखील काही कमी नाहीत.
एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्री म्हणून पहिलेच अधिवेशन आहे. हिंदुत्व आणि राज्याच्या विकासासाठी त्यांनी बंड केला असे ते वारंवार सांगत आलेले आहेत. आता अधिवेशनात विकासकामांबद्दल मुख्यमंत्री शिंदे काय सांगणार हे पहावे लागणार आहे. १७ ते २५ ऑगस्ट या कालावधीत पावसाळी अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनात पूरस्थिती, शेतकऱ्यांचे नुकसान, आमदारांचा बंड, मागील सरकारच्या कामाची चौकशी,रखडलेले प्रकल्पअसे अनेक मुद्दे गाजणार आहेत. एकूणच यंदाचे पावसाळी अधिवेशना घमासान होणार यात शंकाच नाही.