शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारातील महत्त्वाचे मुद्दे !

एक महिन्याहून अधिक काळ रखडलेला मंत्रिमंडळाचा विस्तार आज  (९ ऑगस्ट) पार पडला. राज भवानातील दरबार हॉलमध्ये एकूण १८ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह एकूण 20 जणांचे हे मंत्रिमंडळ असणार आहे. शिंदे सरकारमधील मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे मुद्दे पुढील प्रमाणे आहेत. 

एकूण १८ मंत्र्यांचा शपथविधी पार पडला त्यात भाजपचे ९ आणि शिंदे गटातील ९ मंत्र्यांनी शपथ घेतली

भाजपच्या आरोपानंतर पद गमवालेल्या संजय राठोड यांना मंत्रिपद देण्यात आलंय.

विस्ताराच्या पहिल्या टप्प्यात फडणवीस यांच्या निकटवर्तीयांना संधी मिळाली आहे

विस्ताराच्या पहिल्या टप्प्यात अपक्षांना स्थान नाही 

बच्चू कडूसह एकाही अपक्षाला मंत्रिपद मिळालेलं नाही

पहिल्या टप्प्यात औरंगाबादला लॉटरी लागली, ३ कॅबिनेट मंत्रिपदं, २ भाजप आणि १ शिंदे गटातील आहे.  

पहिल्या टप्प्यात आरोप झालेल्या ४ नेत्यांनी घेतली शपथ 

अब्दुल सत्तार, विजयकुमार गावीत, संजय राठोड, तानाजी सावंतांनी मंत्रिपदाची  शपथ घेतली. 

भाजपमध्ये इमकमिंग झालेले राधाकृष्ण विखे पाटील आणि गावितांना मंत्रिपद देण्यात आलंय. 

या शपथविधी सोहळ्याला राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भाजपचे राष्ट्रीय महसचिव विनोद तावडे उपस्थित होते. 

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.