शिंदे सरकारमधील ‘हा’ मंत्री आहे ४४ हजार २७० कोटींचा मालक

शिंदे सरकारचा मंत्रिपद विस्तार ९ ऑगस्ट रोजी पार पडला. पहिल्या टप्प्यात भाजप आणि शिंदे गटातील प्रत्येक ९ अशा एकूण १८ मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलेला आहे. पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारात एका नेत्याची खूप चर्चा झाली. विशेष म्हणजे पहिल्यांदाच मंत्री झालेल्या या आमदारीच संपत्ती पाहून तुमचे डोळे नक्कीच पांढरे होतील कारण या आमदाराची एकूण संपत्ती आहे ४४ हजार २७० कोटी रुपये. अशा या गर्भश्रीमंत भजाप आमदाराचं नाव आहे मंगलप्रभात लोढा. भाजपचे मुंबई अध्यक्ष असणारे लोढा, त्यांच्याकडील संपत्तीमुळे पुन्हा एकदा चर्चेत आलेले आहेत. लोढा प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अशून फोर्ब्स मासिकानेही त्यांची दखल घेतलेली आहे.
जीआरओएचई हर्नूर इंडिया रिअल इस्टेट रिच लिस्ट २०२० ने दिलेल्या माहितीनुसार लोढा यांची एकूण संपत्ती ४४ हजार २७० कोटी रुपये इतकी आहे. त्यानंतर दुसरा क्रमांक डीएचएफचे राजीव सिंघ यांचा येतो त्यांची एकूण संपत्ती ३६ हजार ४३० कोटी रुपये इतकी आहे. श्रीमंत बांधकाम व्यावसायिकांच्या यादीत लोढा हे गेल्या पाच वर्षांपासून सर्वात श्रीमंत बांधकाम व्यवसायीक म्हणून पहिल्या स्थानी आहेत. २०२० मध्ये लोढा यांची संपत्ती ३९ % वाढलेली आहे. कोरोना काळात अर्थात २०२०मध्ये सर्वाधिक नफा मिळविणाऱ्या बांधकाम व्यवसायातील कंपन्यांमध्ये लोढा ग्रूप अग्रस्थानी होता असा अहवालात म्हटलं आहे.
२०१९मध्ये मलबार हिल मतदारसंघातून ७० हजाराहून अधिक मताधिक्याने लोढा निवडून आले होते. मुळचे जोधपूर असणारे लोढा १९८१ मध्ये मुंबईत आले आणि त्यांनी रिअल इस्टेट क्षेत्रात स्वतःचा दबदबा निर्माण केला. मुंबईमधील मारवाडी समाजातील भाजपचा प्रमुख चेहरा ही लोढा यांची ओळख आहे. १९९५ पासून सलग सहावेळ मंगलप्रभात लोढा विधानसभेवर निवडून गेले पण त्यांना एकदाही मंत्रिपद देण्यात आलं नव्हतं मात्र शिंदे सरकारच्या काळात लोढा मंत्री झाले आहेत.