‘सिनिअर’ संजय शिरसाट ‘ज्युनिअर’ का झाले?

एकनाथ शिंदे यांच्या बंडावर ठाकरेंवर पहिला वार केला ते होते औरंगाबादचे आमदार संजय शिरसाठ पण मंत्रिमंडळ विस्ताराच्या बाबतीत शिरसाटांचा मात्र मोठा गेम झाला. तीनवेळा आमदार राहीलेल्या शिरसाठ यांचा मंत्रिमंडळ विस्तारात पत्ता कट झालाय. त्याचबरोबर तर औरंगाबादमधील नवखे लोक आता शिरसाठांना आता सिनीयर झाले आहेत. शिरसाठांचे मंत्रिपद कसे हुकले, त्यांचे ज्युनिअर आता सिनीयर कसे झाले आणि औरंगाबादच्या राजकारणावर याचा परीणाम कसा होईल याची चर्चा सगळीकडे रंगलेली आहे.
औरंगाबाद म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला मात्र येथेच शिवसेनेच्या बंडाला सर्वात जास्त प्रतिसाद मिळाला. सहापैकी पाच आमदारांनी बंड केला आणि मराठवाड्यात शिवसेनेला उभी फूट पडली. शिंदे गटात असताना शिरसाठ यांनीच ठाकरेंना पत्र लिहून हल्लाबोल केला होता. त्यात मविआमध्ये ठाकरेंनी आपल्याला मंत्री केलं नाही याची मोठी बोच होती. औरंगाबादच्या राजकारणाचा विचार करता शिरसाठ हे शिंद गटाचा चेहरा आहेत.शिरसाठ तीनवेळ आमदार झाले पण त्यांना मंत्रिपद मिळालं नाही. शिंदे गटात आल्यानंतर मंत्रिपद मिळेल अशी त्यांना अपेक्षा होती पण ऐनवेळी त्यांचा पत्ता कट झाला.शिंदे सरकारने जुन्या म्हणजे संदिपान भुमरे आणि अब्दुल सत्तार यांना संधी देत, शिरसाठ यांना वेटिंगला टाकलं. या प्रकारामुळे औरंगाबादच्या राजकारणात शिरसाठ आता बॅकफूटवर गेले आहेत.
शिंदे सरकाने नवख्यांना संधी दिली पण जुनेजाणते मागे राहीले. बंडखोरीनंतर अंबादास दानवे आणि संजय शिरसाठ यांच्यात कडाक्याची हाणामारी झाली. त्याच दानवेंना आता ठाकरेंनी विधानपरिषदेचं विरोधीपक्ष नेतेपद दिलंय. पहिल्यांदा आमदार झालेल्या दानवेंना मंत्रिपदाचा दर्जा असेलेलं पद मिळालं आहे.हा शिससाठांना मोठा धक्का आहे असे म्हटले जाते आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपने सावेंना मंत्री करुन शिंदे गट आपल्या सोबत आला असला, तरी औरंगाबादवर आपलं वर्चस्व मिळवण्याचा दावा कायम ठेवलेला आहे.
आता कसं झालंय दानवे, सावे आणि कराड यांना मंत्रिपदाचा दर्जा मिळाल्यामुळे औरंगाबादच्या राजकारणात सीनियर झाले आहेत. मात्र खऱ्या अर्थाने राजकारणाच सिनीअर असणारे संजय शिरसाठ मात्र ज्युनियर झालेले आहेत. एवढंच नाही तर शिष्ठाचारानुसार कोणत्याही कार्यक्रमात किंवा सरकारी कार्यक्रमात संजय शिरसाठ यांचे नाव त्यांच्या मागून आलेल्या लोकांनंतर येणार आहे. हीच बोचणी शिरसाठांना लागली असून पत्रकारांना ती बोलून दाखवली आहे. मी नाराज झालो आहे पण आहे तिथेच ठीक आहे असे शिरसाठ म्हणाले आहेत.तीनवेळा आमदार तरी अजूनही संधीच्या प्रतिक्षेत अशीच अवस्था शिरसाट यांची झालेली आहे.