मुख्यमंत्र्यांची दिल्लीवारी का झाली रद्द?

महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्ली रौदा रद्द करण्यात आला आहे. हा दौरा का रद्द झाला याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र मुख्यमंत्र्यांची दिल्लीवारी रद्द झाल्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार पुढे गेल्याची चर्चा सुरु झाली आहे.

मुख्यमंत्री आज ( २७ जुलै) दिल्लीला जाणार होते मात्र आता हा दौरा रद्द झालेला आहे. राज्यात सत्तास्थापन होवून २४ दिवस झाले आहेत तरी मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी आजचा मुख्यमंत्र्यांचा दिल्ली दौरा महत्त्वाचा मानला जात होता

नियोजित वेळापत्रकानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रात्री दिल्लीत येणे अपेक्षित होते. या दिल्ली दौऱ्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत मंत्रिमंडळाची चर्चा करणार होते असे बोलले जाते आहे. पण मुख्यमंत्री शिंदे दिल्लीसाठी रवाना झालेच नाहीत. ते मुंबईत आहेत त्यामुळे आता हा दिल्ली दौरा कधी होणार याकडे सगळ्यांचे डोळे लागले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.