शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळात छोट्या पक्षांना सरप्राईज मिळणार?

फडणवीस-शिंदे यांच्या नव्याने स्थापन झालेल्या सरकारमध्ये सहकारी लहान पक्षांना व अपक्ष आमदारांना स्थान मिळू शकते तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नक्की सर्वांना सरप्राईज मिळेल असं देखील एका कार्यक्रमात म्हटलं आहे.
दिल्लीत मोठी घडामोड, बंडखोर खासदारांनी घेतली लोकसभा अध्यक्षांची भेट
शिंदे समर्थक खासदारांनी लोकसभेच्या अध्यक्षांची भेट घेऊन एनडीएला पाठींबा देत असल्याबद्दलचे नियम आणि एकूण संख्येबद्दल बोलणं झालं असल्याचं वृत्त आहे. शिंदे समर्थक खासदार गटाने पत्रे लिहिताना प्रतोदपदी असणाऱ्या व्यक्तीचं नाव लिहावं, असा सल्ला लोकसभा सचिवालयातर्फे देण्यात आला आहे. शिवसेनेचे सर्व १८ खासदार आपल्या बाजूचे आहेत आणि सर्वजण येणार असून आपण त्यांची भेट घेणार असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले
सर्व मित्र पक्षांना सत्तेचा मिळणार वाटा
शिंदे-फडणवीस सरकारला ज्यांनी ज्यांनी सरकार स्थापनेत मदत केली त्या सर्व छोट्या पक्षांतील आमदारांना मंत्रिमंडळाचा भाग करून घेणार असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. म्हणून कोणत्या मित्र पक्षांना या सरकारमध्ये संधी मिळते, ते आता पहायचं आहे.
कोणत्या छोट्या पक्षांनी व अपक्ष आमदारांनी मदत केली?
बहुजन विकास आघाडी ,प्रहार जनशक्ती पक्ष ,मनसे, जनसुराज्य शक्ती आणि इतर छोटे पक्ष व अपक्ष आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला मदत केली. राजेंद्र यड्रावकर, राजकुमार पटेल, बच्चू कडू, किशोर जोरगेवार, चंद्रकांत पाटील, आशिष जायसवाल, गीता जैन, विनोद अग्रवाल यांचाही पाठिंबा मिळाला आहे. त्यामुळे शिंदे फडणवीस या आमदारांना मंत्रीपदाची किंवा महामंडळाचे सरप्राईज देण्याची शक्यता आहे.