CM शिंदेंनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या ‘शुभेच्छां’ची का होतेय चर्चा?

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे.लाखो शुभेच्छांचा वर्षाव त्यांच्यावर होतो आहे पण सध्या सगळीकडे चर्चा आहे ती एका शुभेच्छेची आणि ती दिली आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी. आमदारांची बंडखोरी, आरोप- प्रत्यारोप, टीकास्त्र हा सगला संघर्ष सुरु असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांनी ट्विट करून, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय श्री.उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना….असे म्हटले आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांनी शुभेच्छा देताना उद्धव ठाकरे यांचा उल्लेख माजी मुख्यमंत्री असा केला आहे. याच गोष्टीची सगळीकडे चर्चा होते आहे.या शुभेच्छा देताना उद्धव ठाकरेंचा उल्लेख शिवसेना पक्षप्रमुख असा न करता माजी मुख्यमंत्री केला आहे. यामुळे आता एकनाथ शिंदे यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे पक्षप्रमुख मानण्यासही नकार दिल्याची चर्चा रंगलेली आहे.
उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस असून यानिमित्ताने मातोश्रीवर शक्तीप्रदर्शन केलं जाण्याची शक्यता आहे. शक्तीप्रदर्शनाच्या माध्यमातून बंडखोर आमदारांना आपली ताकद दाखवण्याचा उद्धव ठाकरेंचा प्रयत्न असेल. गेले दोन दिवस उद्धव ठाकरेंची मुलाखत देखील प्रसारीत आली त्यात बंडखोर आणि विरोधकांना त्यांनी चांगलेच धारेवर धरले होते.