सततची दगदग भोवली,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पडले आजारी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत बिघडली असून त्यांना डॉक्टरांना सक्तीची विश्रांती सांगितली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी सर्व प्रशासकिय बैठका रद्द केलेल्या आहेत. सतत होणार दौरे, पहाटेपर्यंत चालणाऱ्या सभा यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांना थकवा जाणवू लागला आहे अशी माहिती समोर आली आहे.तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाले आहे. पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा करणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. राज्यात सरकार स्थापन होवून एक महिना झाला तरी अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही तसेच आज सुप्रीम कोर्टात झालेली सुनावणी या पार्श्वभूमीवर फडणवीस यांची दिल्लीवारी महत्त्वाची मानली जाते आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांनी २० जूनला बंड पुकारला आणि त्यांनतर झालेल्या घडामोडी आपल्याला माहितच आहे. सुरत-गुवाहाटी-गोवा असे मार्गक्रमण त्यांनतर भाजपसोबत सत्तास्थापना. मुख्यमंत्री झाल्यानंतर सतत होणारे दौरे, सभा, पत्रकार परिषद, भाषणे तसेच दिल्लीवारी असं मुख्यमंत्र्यांचं अतिव्यस्त वेळापत्रक होतं. याचा ताण मुख्यमंत्र्यांना झालाय. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना सक्तीचा आराम करण्याची सुचना दिलेली आहे.शिंदेंनी एक दिवसाच्या सर्व प्रशासकिय बैठका रद्द केलेल्या आहेत.
मुख्यमंत्री शिंदे यांच्या प्रकृतीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी चिंता व्यक्त केली आहे. ‘स्वतःची काळजी घ्या असे म्हणत भुजबळ म्हणालेत, राज्यात सध्या दोनच मंत्री आहेत ते दिवस-रात्र एक करून काम करत आहेत. आपल्या देहाची एक परिसीमा असते त्यामुळे तुम्ही थोडातरी पॉझ घ्यावा’ असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.