ठाकरेंनी फिरवला फडणवीसांना फोन?

महाविकास आघाडी सरकार वाचवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना फोन केल्याचं वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिलं आहे. २१ जूनला उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाल्याचा दावा करण्यात येत आहे. याशिवाय उद्धव ठाकरेंना भाजपाच्या श्रेष्ठींसोबतही संवाद साधण्याचा प्रयत्न केल्याचा दावा आहे. दरम्यान यावर शिवसेनेकडून स्पष्टीकरण देण्यात आलं असून या निव्वळ भूलथापा असल्याचा सांगितलं आहे.
शिवसेनेकडून स्पष्टीकरण
“सरकार वाचवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना फोन केला अशा बातम्या प्रकाशित होत आहेत. या निव्वळ भूलथापा आहेत. उद्धव ठाकरे जे बोलायचे ते खुलेआम बोलतात. कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये आणि पसरवू नये,” असं आवाहन शिवसेनेकडून कऱण्यात आलं आहे.
भाजप वेट अँड वॉचच्या भूमिकेत : सुधीर मुनगंटीवार
भाजप सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्याचं वक्तव्य पुन्हा एकदा भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं आहे. सोबतच उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेल्या संवादाची आम्हाला कल्पना नाही, असं स्पष्टीकरणंही त्यांनी दिलं आहे.