भाजप बहुमत जिंकणार? काय आहे विधानसभेतलं गणित?

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्यास सांगितलं आहे. त्यामुळे ठाकरे सरकारवरील संकट अधिक गडद झालं आहे. 30 जून रोजी सकाळी 11 वाजता बहुमत चाचणी होणार आहे. राज्यपालांच्या निर्णयाला स्थगिती मिळावी म्हणून शिवसेना कोर्टात गेलेली आहे. एकणऊच आता राजकारणात नंबर गेम सुरु झालाय.

आघाडीच्या हातून किती आमदार निघून गेले?

शिवसेनेकडे 55 आमदार आहेत. त्यातील 39 आमदारांनी बंड केलं आहे. ठाकरे सरकारमधील दोन आमदारांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच राष्ट्रवादीचे दोन आमदार तुरुंगात आहेत. म्हणजे 43 आमदार आघाडीच्या हातून निघून गेले आहेत. तसेच प्रहारचे दोन आमदार आणि इतर 7 अपक्ष आमदारांनीही शिंदे गटाला समर्थन दिलं आहे. त्यामुळे एकूण 50 आमदारांची आघाडीला कमतरता भासणार आहे.

काय आहे प्लॅन?

दुसरीकडे शिवसेनेने 16 आमदारांना अपात्रं ठरवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. शिंदे गटाने तांत्रिक कारणं पुढे देत शिवसेनेची कृती चुकीची आहे असं म्हटलं असलं तरी बंडखोरांसाठी वाटतो तितका मार्ग सोपा राहिलेला नाही. हे प्रकरण कोर्टात असल्याने कोर्ट काय निर्णय देतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. शिंदे गटाकडे शिवसेनेचे 39 आमदार आहेत. म्हणजे शिंदे गटाकडे दोन तृतियांश मते आहेत. त्यामुळे त्यांच्यावर पक्षांतर बंदी कायदा लागू होत नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे वेगळा गट स्थापन करून हे लोक भाजपला पाठिंबा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आकडे काय सांगतात?

महाराष्ट्राच्या विधानसभेत एकूण 288 आमदार आहेत. त्यापैकी शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचं निधन झाल्याने हा आकडा 287 झाला आहे. त्यामुळे सरकार स्थापनेसाठी 144 आमदारांची गरज आहे. राष्ट्रवादीकडे 53 आमदार आहेत. काँग्रेसकडे 44 आमदार आहेत. शिवसेनेकडे 55 आमदार आहेत. तिन्ही पक्षाच्या एकूण आमदारांची संख्या 152 होते. त्याशिवाय महाविकास आघाडीला बच्चू कडू यांच्या दोन आमदारांनी आणि इतर अपक्षांनी पाठिंबा दिला आहे. म्हणजे आघाडीला बविआच्या 3, सपाच्या दोन, पीजेपीच्या दोन आणि पीडब्लूपीच्या एका आणि 8 अपक्षांचा पाठिंबा आहे. मात्र, आता खेळ बिघडला आहे. कारण शिवसेनेच्या 39 आमदारांनी बंड केलं आहे. तर आघाडीच्या सर्व अपक्षांनी आणि प्रहारच्या दोन आमदारांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे शिवसेनेकडे केवळ 16 आमदार उरले आहेत.

भाजपकडे मॅजिक फिगर !

दुसरीकडे भाजपकडे 106 आमदार आहेत. त्यांना सात अपक्षांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे भाजपचा आकडा 113 झाला आहे. बहुमत सिद्ध करण्यासाठी 144 आमदार हवे आहेत. शिंदे गटाकडे 39 आमदार आहेत. हे आमदार 30 जूनला  मतदानात सहभागी नाही झाल्यास बहुमतासाठीचा आकडा 121 होईल. अशावेळी भाजपकडे 113 आमदार आहेत. त्यांच्यासोबत 16 अपक्ष आणि इतर आमदारही आहेत. त्यामुळे भाजपचं संख्याबळ 129 वर पोहोचेल. तर 113 आमदाराच हाती असल्याने आघाडी सरकारला बहुमत सिद्ध करता येणार नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.