मलिक, देशमुख आधीच ईडीच्या अटकेत, आता राऊतही? 

शिवसेना खासदार संजय राऊत यांना चौकशीसाठी ईडीने ताब्या घेतल्यानंतर भाजप नेत्यांनी या कारवाईचे स्वागत केले आहे. लवकरच संजय राऊत यांना नवाब मलिक यांच्या शेजारी रहायला जावे लागणार असे म्हणत त्यांनी राऊतांवर निशाणा साधला आहे. तर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी तुम्ही करत असलेल्या व्यवसायात गडबड केलीत म्हणून कारवाई होतेय असे म्हटले आहे.

भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी एक सूचक ट्विट केलेले आहे. त्यात फक्त एक शब्द लिहीला आहे तो म्हणजे ‘खाकस्पर्श’ आणि एक फोटो ट्विट केला आहे त्या फोटोत शरद पवार यांनी अनिल देशमुख, नवाब मलिक आणि संजय राऊत यांचा हात हातात घेतलेला पहायला मिळतो आहे. भाजप आमदार राम कदम यांनी ही तोच फोट ट्विट करत याला योग्य कॅप्शन द्या असे म्हटले आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी संजय राऊत यांना राज ठाकरे यांनी दिलेल्या एका सल्ल्याची आठवण करून दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.