संजय राऊतांना जामीन की पुन्हा कोठडी?

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुनावणी सुरु झाली आहे. संपूर्ण देशाचं सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष लागलेलं आहे. दरम्यान आज आणखी एक महत्त्वाची सुनावणी आहे ती म्हणजे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची ईडी कोठडीटी मुदत आज (४ ऑगस्ट) संपत आहे. संजय राऊत यांना पुन्हा आज कोर्टात हजर केले जाणार आहे. आज होणाऱ्या सुनावणीत संजय राऊत यांना जामीन मंजूर होणार की कोठडीत वाढ होणार याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.
मुंबईमधील १ हजार ०३४ कोटींच्या पत्राचाळ पुनर्विकासात झालेल्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत अडचणीत आले आहेत. रविवारी राऊत यांच्या भांडूप येथील बंगल्यावर धाड टाकण्यात आली. त्यांची ९ तास चौकशी झाली आणि त्यांना ईडी कार्यालयात नेण्यात आले होते. त्यानंतर तिथेही त्यांची चौकशी करुन त्यांना अटक करण्यात आली होती. संजय राऊत यांना अटक केल्यानंतर राज्यात शिवसैनिक आक्रमक झालेले पहायला मिळाले. संजय राऊतांच्या अटकेनंतर ईडीने अनेक ठिकाणी छापेमारी केली. आज पुन्हा संजय राऊत यांच्यावर सुनावणी आहे तेव्हा कोर्टाकडून काय निर्णय येतो याबद्दल सगळ्यांना उत्सूकता आहे.
आपल्याला माहित असेल माजी गृहमंत्री अनिल देशमुख गेल्या ८ महिन्यापासून तुरुंगात आहेत. अशीच स्थिती माजी मंत्री नवाब मलिक यांची आहे. नवाब मलिक ४ महिन्यांपासून कोठडीत आहेत. या दोघांना अद्याप जामीन मिळालेला नाही.तेव्हा आता संजय राऊतांना जामीन मिळत की कोठडी हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.