अतिवृष्टीचा शेतीला फटका, मुंबईत भाजीपाल्याची आवक घटली

राज्यात जून महिन्यात अपेक्षेप्रमाणं मान्सूनचा पाऊस पडला नाही. मात्र, जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरावड्यात मोठ्या प्रमाणात पावसानं हजेरी लावली आहे. जुलै महिन्यात सुरु झालेल्या अतिवृष्ठीचा भाजीपाला शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना फटका बसला आहे. भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात घटल्यानं भाज्यांचे दर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुंबईला प्रामुख्यानं नाशिक, पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यातून भाजीपाला पुरवठा केला जातो. मात्र, भाजीपाल्याची आवक देखील घटली आहे.नाशिकहून मुंबईला होणारा भाजीपाला नेहमीच्या प्रमाणात केवळ ३० टक्के होत आहेत. नाशिकमधून मुंबईला येणाऱ्या वाहनांना रस्त्याच्या दुरावस्थेचा सामना करावा लागत आहे, त्यामुळं देखील भाजीपाला पुरठ्यावर परिणाम झाला आहे.