BJP आमदाराला शिक्षकाने झापले, Viral Video ऐकला का?

भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी विधानसभेत एक मुद्दा उपस्थित केला त्यामुळे शिक्षक आक्रमक झालेले आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक कामाच्या ठिकाणी राहत नाही असे प्रशांत बंब म्हणाले त्यामुळे शिक्षकांमध्ये नाराजीचा सुर पसरलेला आहे. दरम्यान एका शिक्षकाने बंब यांना फोन करून याबाबत खडेबोल सुनावले आहेत.सध्या सोशल मीडियावर शिक्षक आणि भाजप आमदार बंब यांचे संभाषण व्हायरल झाले आहे. आम्ही या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही पण या संभाषणाची चांगलीच चर्चा रंगलेली आहे.
विधानसभेतील बंब यांचे भाषण ऐकल्यानंतर त्या शिक्षकाने आमदार बंब यांना फोन केला आणि झापझाप झापले आहे. या शिक्षकाने शिक्षणक्षेत्रातील त्रुटींवर बोट ठेवले आहे. कन्नड जिल्हा परिषदेच्या शाळेची दूरवस्था सांगत त्या शिक्षकाने एक आमदार म्हणून तुम्हाला ला* वाटली पाहिजे, असे म्हणत या शिक्षकाने बंब यांचा पाणउतारा केलाय. बंब आणि शिक्षक यांच्यातील ही ऑडिओ क्लीप सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतेय.
शिक्षकाच्या अशा बोलण्यामुळे बंब यांना चांगलाच संताप आलेला पहायला मिळतोय. बंब यांनीही शिक्षकाला चांगलेच शाब्दिक फटकारे दिलेले आहेत. शिक्षकांना ला* वाटत नाही का? असे बंब म्हणाले. स्वताःची मुले खासगी शाळेत शिकवता असेही आमदार बंब म्हणाले. त्यामुळे आमदार बंब आणि या शिक्षकाची ऑडीओ क्लिप सद्या चर्चेचा विषय बनला आहे.