शिंदे सरकार, २५ दिवसात ५३८ शासन आदेश !!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होवून २५ दिवस झालेत. मात्र अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. तरी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना कामांचा झपाटा लावलेला पहायला मिळतो आहे. प्रशासकिय पातळीवर बैठका होत असून कामांचा झपाटा लावलेला पहायला मिळतोय.मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नसल्यामुळे धोरणात्मक निर्णय जरी झालेले नसले तरी नियमीत निर्णय मोठ्या प्रमाणात होत आहेत.या २४ दिवसांमध्ये शिंदे सरकारने तब्बल ५३८ शासन निर्णय काढले आहेत.
विभाग | निर्णय |
ग्रामविकास विभाग | २२ |
कृषी, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय | २२ |
उच्च व तंत्रशिक्षण | २१ |
गृह विभाग | २० |
आदिवासी विभाग | १९ |
मृद व जलसंधारण | १७ |
सामाजिक न्याय व विशेष साहाय्य | १४ |
सहकार, पणन व वस्त्रोद्योग | १३ |
सार्वजनिक बांधकाम | १३ |
कौशल्य विकास व उद्योजकता | १२ |
महिला व बालकल्याण विभाग | १० |
सार्वजनिक आरोग्य | ७३ |
पाणीपुरवठा व स्वच्छता | ६८ |
शालेय शिक्षण व क्रीडा | ४३ |
सामान्य प्रशासन | ३४ |
जलसंपादन,महसूल व वन विभाग आणि वैद्यकिय शिक्षण व औषधी द्रव्य | प्रत्येकी २४ |
राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांना शपथ घेऊन 25 दिवसच झाले असून मुख्यमंत्र्यांनी आपलं कामकाज जोरदारपणे सुरु केलं आहे.प्रशासकीय पातळीवर मोठ्या प्रमाणात निर्णय होताना बघायला मिळत आहे. मंत्रिमंडळ अस्तित्वात नसले तरी कामाजा जोर मात्र वाढला आहे. याचा सखोल विचार केला तर २४ दिवसात ५३८ शासन निर्णय म्हणजे दिवसाकाठी २२ निर्णय घेण्यात आले आहेत.महाविकास आघाडी सरकारने घेतलेले निर्णय त्यापेक्षा हा वेग जास्तच आहे. या निर्णयांमध्ये पदोन्नती आणि सेवा संदर्भातील सर्वाधिक शासन निर्णय पाहायाला मिळत आहेत.