…तरीही शिवसेना सोडणार नाही – संजय राऊत

खासदार संजय राऊत यांच्या घरी ईडी टीम दाखल झाली आहे. पत्राचाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी आज पुन्हा संजय राऊत यांची चौकशी होणार आहे. ईडीने संजय राऊत यांना समन्य पाठवले होते पण त्यांच्याकडून कोणतेही उत्तर न मिळाल्यामुळे आणि ते चौकशीत सहकार्य करत नसल्यामुळे ईडीचे पथक आज त्यांच्या घरी दाखल झालं आहे असे बोलले जाते आहे. संजय राऊत यांच्या पत्नीची देखील चौकशी होणार आहे. ईडीचे 10 अधिकारी संजय राऊत यांच्या घरी दाखल झालेले आहेत.
ईडीकडून छापेमारी आणि चौकशी सुरु असताना संजय राऊत यांनी एकापाठोपाठ एक तीन ट्विट केलेली आहेत. खोटी कारवाई, खोटे पुरावे, मी शिवसेना सोडणार नाही..मरेन पण शरण जाणार नाही जय महाराष्ट्र असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत यांनी केलेल्या ट्विटमधून त्यांनी स्पष्ट सांगितले आहे की कोणत्याही घोटाळ्याशी माझा काडीमात्र संबंध नाही.शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन मी हे सांगत आहे..बाळासाहेबांनी आम्हाला लढायला शिकवलंय..मी शिवसेनेसाठी लढत राहीन.महाराष्ट्र आणि शिवसेना लढत राहील असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. दरम्यान शिवसेनेचे अरविंद सावंत यांनी ही कारवाई राजकीय सुडबुद्धीने चालली असल्याचं म्हटलं आहे.