मंत्रिपदासाठी बंडखोरांमध्ये रस्सीखेच? ‘या’ नेत्याचं नाव आघाडीवर !

आता शिंदे सरकारच्या नव्या मंत्रिमंडळाची चर्चा सुरू झाली. मंत्रिमंडळात कुणाकुणाची वर्णी लागणार? याचेही अंदाज लावले जाताहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडामध्ये तो जळगाव जिल्ह्यातील आमदारांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. जळगावच्या तब्बल पाच आमदारांनी बंडखोरी केली. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील कुणाकुणाच्या मंत्रीपदाची माळ घातली जाणार? याची उत्सुकता आहे.

जळगाव जिल्ह्याला किती मंत्रिपदे?

शिंदे सरकारमध्ये जळगाव जिल्ह्यातल्या दोन आमदारांना कॅबिनेट मंत्रिपदे हमखास मिळतील, अशी सूत्रांची माहिती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोडे अजून उदार झाले तर जळगावच्या अजून एक आमदार राज्यमंत्री म्हणून शपथ घेताना दिसेल. भाजपचे नेते गिरीश महाजन आणि शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांचे मंत्रिपद जवळपास निश्चित मानलं जातं आहे. जिल्ह्यात एकाचवेळी तीन मंत्रिपदे राहण्याचीही शक्यता आहे. युती सरकारमध्ये गुलाबराव पाटील राज्यमंत्री होते तर गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे हे कॅबिनेट मंत्रीपदी होते तर हेच सूत्र आताही कायम असू शकेल.

राज्यमंत्री पदासाठी शिवसेनेत मोठी रस्सीखेच आहे. जोरदार स्पर्धा असेल ती शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आमदार चिमणराव पाटील यांच्यासह पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील व मुक्ताईनगरचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्यात. आजवर तीन वेळा चिमणराव पाटील यांना विधानसभेत जाण्याची संधी सेनेतर्फे मिळाली आहे. जिल्ह्यातील मराठा समाजाचा विचार करता त्यांची मंत्रीपदी वर्णी लागू शकते. याआधी ही संधी गुलाबराव पाटलांना मिळाली होती. किशोर पाटील हे एकनाथ शिंदेच्या जवळचे आहेत, म्हणून त्यांचं ही नाव या यादीत आहे. खडसेंचं महत्व कमी करण्यासाठी मुक्ताईनगरमधून विधानसभेत गेलेले चंद्रकांत पाटील हे ही मंत्री होऊ शकतात. पण ही शक्यता खूपच कमी आहे.

नव्या सरकारमधील जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी कोण बसणार, याचीही चर्चा आहे. शिंदे सरकारचा पूर्ण होल्ड भाजपकडे असल्याची चर्चा असल्याने जळगावचं पालकमंत्री पद भाजप सोडेल का? हा प्रश्न आहे. 

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.