अंधेरी पोटनिवडणुकीसाठी शिंदे गट मैदानात, भाजपचे मुरजी पटेल माघार घेण्याची शक्यता

आता सगळ्या राज्याचे लक्ष अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीकडे लागलेले आहे. या निवडणुकीत आता मोठा ट्विस्ट निर्माण झालाय. भाजपचे संभाव्य उमेदवार मुरजी पटेल माघार घेण्याची शक्यता आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील ‘बाळासाहेबांची शिवसेना’ अंधेरीच्या मैदानात उतरणार असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे अंधेरीची निवडणूक खऱ्या अर्थाने शिंदे आणि ठाकरेंसाठी लीटमस टेस्ट असेल असेच म्हणावे लागेल.
एकनाथ शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव आणि ढाल तलवार निवडणूक चिन्ह मिळाल्यामुळे त्यांच्या आत्मविश्वास फारच वाढला आहे. त्यामुळे ती जागा भाजपल सोडण्याऐवजी शिंदे गट हक्काच्या मतदारसंघाच आपला उमेदवार देणार अशी शक्यता आहे. तेव्हा भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना युतीमध्ये ही निवडणूक लढवली जाईल अशी शक्यता आहे.
आता शिंदे कोणाला उमेदावरी देणार हे गुदस्त्यात आहे मात्र मुरजी पटेल यांनी उमेदवारी मागे घेतली, तरी त्यांचे बळ युतीच्या उमेदवाराच्या मागे लागेल यात शंकाच नाही. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर केलीय. पण तिथे ही ठाकरेंची कोंडीच आहे. ऋतुजा लटके महापालिका कर्मचारी असून त्यांचा राजीनामा अद्याप मंजूर झालेला नाही त्यामुळे त्यांना उमेकदावीर अर्ज भरता येत नाहीए. तेव्हा आता चिन्ह आहे पण उमेदवार नाही असा पेच ठाकरेंसमोर आहे. त्यातच शिंदे गटाने ऋतुजा लटके यांना आपल्या गटात खेचण्यासाठी दबाव आणल्याचेही बोलले जात आहे.