अंधेरी पूर्वची जागा एकनाथ शिंदेंनी भाजपला का सोडली? या कारणांमुळे सूत्र फिरली !

मुंबई हायकोर्टाने निकाल दिल्यानंतर ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांची उमेदवारी अंधेरी विधानसभा पोटनिवडणूकीसाठी निश्चित झालेली आहे. त्यांनतर प्रश्न होता भाजप कडून कोणाला उमेदवारी देण्यात येते आहे कारण शिंदे गट आपला उमेदवार देणार अशी चर्चा सुरु होती. सगळा सस्पेन्स निर्माण झाला होता. अखेर याबाबत शिंदे आणि भाजपचा निर्णय झाल्याची माहिती समोर आलेली आहे.
मुख्यमंत्री शिंदे आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्यात काल रात्री उशिरा बैठक झाली त्यात शिंदे यांनी ही जागा भाजपसाठी सोडल्याचे समजते. त्यानुसार भाजपकडून मुरजी पटेल ही जागा लढवणार असल्याचं आता स्पष्ट झालंय.पण आता प्रश्न आहे शिवसेनेची हक्काची जागा भाजपसाठी का सोडली याची काही कारणे आहेत. शिंदे गटाला ‘ढाल तलवार’ हे नवीन निवडणूक चिन्ह आणि ‘बाळासाहेबांची शिवसेना’ नाव मिळालं. आता अंधेरी निवडणूकीसाठी हे चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचवणे हे मोठे आव्हान शिंदे समोर होते त्यामुळे भाजपसाठी ती जागा सोडली.
अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची स्थानिक समीकरणं आणि मतदार लक्षात घेता मुरजी पटेल यांच्या बाजूने झुकते माप जाते. येथे मराठी मतांसोबत मुस्लिम, मारवाडी, गुजराती, ख्रिश्चन या मतांचं प्राबल्य आहे तिथे कमी कालावधीत पोहोचणे आव्हानात्मक आहे शिंदेंना चांगंलच माहित आहे. सहानुभुती हा मोठा फॅक्टर ऋतुजा लटके यांच्यासोबत आहे. शिंदेंनी ऋतुजा यांना आपल्या गटात ओढण्याचे प्रयत्न केल्याचे आरोप शिंदेंवर झाले. पण लटकेंच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाल्याने त्या आता शिंदे गटात येण्याच्या शक्यता मावळल्या मग काय शिंदे गट बॅकफूटवर आला
शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर राज्यात लागलेली ही पहिलीच निवडणूक आहे. आधीपासून ही निवडणूक म्हणजे ठाकरे आणि शिंदे यांची लीटमस टेस्ट आहे असे म्हटले जाते आहे. त्यात शिंदे गटाचा उमेदवार निवडणूक रिंगणातच उतरला असता तर ती थेट शिंदे विरुद्ध ठाकरे लढत झाली असती. एकूणच सर्व घडामोडी, राजकीय समीकरणे पाहता शिंदेंच्या पराभवाची नामुष्की टाळण्यासाठी हा सेफ गेम खेळला गेलाय असे म्हटले जातेय.