अजित पवारांसह राष्ट्रवादीचे बडे नेते ‘मातोश्री’वर, काय झाली खलबतं?

विरोधी पक्षनेते अजित पवार आणि त्यांच्यासह राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेत यांना मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.नेहमी प्रमाणे ही एक औपचारीक भेट होती असे सांगण्यात येत असले तरी या नेत्यांमध्ये अनेक विषयांवर खलबतं झाली अशी चर्चा आहे. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुनील तटकरे मातोश्रीवर एकत्र जमले होते.या भेटीत सुप्रीम कोर्टातील सुनावणी,मंत्रिमंडळ विस्तार, शिवसेनेचे फायर ब्रँण्ड नेत संजय राऊत यांची अटक आणि आगामी अधिवेशन यावर चर्चा झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर उद्धव ठाकरे एकटे पडल्याचं चित्र होतं. शिवसेनेला दररोज मिळणारे धक्के यामुळे शिवनसेनेतील फूट वाढत होती पण संकटाच्या काळात शिवसेनेच्या बरोबर राष्ट्रवादी मात्र भक्कपणे उभी होती. मविआ सरकारच्या काळात उद्धव ठाकरे यांनी कसे निर्णय घेतले किंवा कारभार कसा चालवला हे राष्ट्रवादीने सगळ्यांना चांगलच स्पष्ट करून सांगितले. 

मात्र जेव्हा संजय राऊत यांना अटक झाली तेव्हा मात्र राष्ट्रवादीचे नेते मौनात होते. पवार यांनी काही मत मांडले नाही पण राहुल आणि सोनिया गांधींनी संजय राऊतांना साथ दिली अशा बातम्या देखील छापून आल्या होत्या. जेव्हा ठामपणे शिवसेनेच्या बाजूने उभे राहायचे होते तेव्हा राष्ट्रवादी नेत्यांची ‘चुप्पी’ बघून शिवसेनेने देखील आश्चर्य व्यक्त केलं होतं. यानंतर दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून शिवसेनेने राष्ट्रवादीला खडे बोलदेखील सुनावले. त्यामुळे राष्ट्रवादीचे काही नेते नाराज झाल्याची चर्चा आहे. 

असे सांगितले जाते की शिंदेंच्या बंडखोरीच्या काळात उद्धव ठाकरेंनी ‘सगळं संपलं’ म्हणत ‘शस्त्र’ टाकून देण्याचा विचार केल्यावर शरद पवार यांनी त्यांना ‘लढण्याची भूमिका’ निर्णायक आहे असे सांगितले होते अशी चर्चा होती. दरम्यान आजच्या भेटीत सुप्रीम कोर्टातली सुनावणी, मंत्रिमंडळ विस्तार, आगामी अधिवेशन या विषयावर चर्चा झाल्याची शंका व्यक्त करण्यात येते आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.