शेवाळेंचा सुपर गौप्यस्फोट, ठाकरे म्हणाले……

आपल्याला भाजप सोबत जायचं आहे, हे खासदारांकडे उद्धव ठाकरे यांनी मत मांडलं होतं. पंतप्रधान मोदींबरोबर त्यांनी याबद्दल तासभर बोलणं केल्याचंहे सांगितलं. पण तेव्हाच भाजपच्या १२ आमदारांना निलंबित केलं गेलं. यावरून भाजपचे पक्षश्रेष्ठी नाराज झाले. आमदारांना निलंबित करणं आणि सोबत युतीवर संभाषण हे एकत्र कसं होऊ शकणार? असा प्रश्न मुंबईचे सेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना विचारला. दिल्लीमध्ये एकनाथ शिंदेंनी सेनेचा एक वेगळं गटकरण्याबद्दलचं पत्र लोकसभा अध्यक्ष बिर्ला यांना दिल्याबद्दल सांगितलं. शिंदेंनी ज्यांना सेनेच्या गटनेतेपदी बसवलं आहे, त्या राहुल शेवाळे यांनी ठाकरेंची सर्व वक्तव्ये मिडीयासमोर उघड केली.
२०१९ च्या निवडणुकीवेळी उद्धव ठाकरे यांनी जाहीरनामा यांनी तयार केला होता. परंतु यातील कोणत्याही मुद्द्याला महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमामध्ये समाविष्ट करण्यात आलं नाही. पक्ष फुटीनंतर २१ जूनला शिवसेना खासदारांची वर्षावर बैठक घेण्यात आली होती त्यावेळी आम्ही सांगितलं की एनडीएसोबत युती करा, त्यावर ‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तर मी तुमची भूमिका आनंदाने स्वीकारेन’ असं उद्धव ठाकरेंनी सांगितल्याचा दावा राहुल शेवाळेंनी केला.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकांसाठी भाजपसोबत युती आवश्यक आहे, असा आम्हा शिवसेना खासदारांचा आग्रह होता, मात्र उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीचा सूर कायम ठेवला. आम्ही विरोध करत त्यांना आपापल्या मतदारसंघातील वस्तुस्थिती सांगितली, मात्र त्यांनी सहकार्य केलं नाही, असं राहुल शेवाळे म्हणाले.
आपण युती करण्यास इच्छुक आहोत, असं उद्धव ठाकरे आम्हाला काही महिन्यांपूर्वी म्हणाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच्या बैठकीत त्यांनी युतीबाबत एक तास चर्चा केली. भाजपशी युती करता यावी, यासाठी माझेही प्रयत्न चालू आहेत. तुम्ही तुमच्या स्त्रोतामार्फत प्रयत्नशील रहा. प्रयत्न सोडू नका.
आमचे सोर्स एकनाथ शिंदे आहेत, म्हणून उद्धव ठाकरेंच्या सांगण्यानुसार प्रयत्न सुरु केला.
तेव्हाच भाजपचे १२ आमदार निलंबित केले गेले. म्हणून भाजपात नाराजीचे सूर उमटले. दुसऱ्या बाजूला, रालोआच्या राष्ट्रपती निवडणुकीतील उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्या बाजूने उभे राहिले. त्यामुळे युतीसाठी प्रयत्नशील असताना संपुआच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांना पाठिंबा दिला गेला. जेव्हा अल्वा यांच्याकडे महाराष्ट्राचे प्रभारीपद होते, तेव्हा त्यांनी शिवसेनेला दाबण्याचा प्रयास केला होता. त्यामुळे त्यांना पाठिंबा देण्याचा प्रश्नच येत नाही, परंतु ठाकरेंच्या या निर्णयाने आम्ही नाराज झालो, असंही राहुल शेवाळे यांनी सांगितलं.