पक्के मित्र राजकीय वैरी कसे झाले?

एकनाथ शिंदे गट आणि भाजप एकत्र आले आणि त्यांनी राज्यात सत्ता स्थापन केली.मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस एकत्र काम करत आहेत. त्यांची केमिस्ट्री उत्तम आहे. पण हे सगळे करत असताना दीपक केसरकर आणि नारायण राणे वादाने डोके वर काढलेले आहे. तसं पाहिलं तर दोघेही एकाच जिल्ह्यातील म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नेते आहेत. एकेकाळी राणे आणि केसरकर यांची मैत्री होती मात्र आता एकेकाळचे मित्र एकमेकांचे राजकीय वैरी झालेले आहेत. खरंतर शिंदे गटाने भाजपची साथ घेतल्यानंतर हे राजकीय वैर संपायला हवं होतं पण तसे झाले नाही. केसरकरांनी राणेंविरोधात भाष्य केलं आणि वादीच ठिणगी पुन्हा पडली. पण या दोघांमध्ये हा वाद का आहे असा ही प्रश्न विचारला जातो आहे. 

खरंतर राणे-केसरकर वाद वर येण्याची ही पहिली वेळ नाही. शिवसेनेत असताना केसरकरांनी राणेंना राजकीय दहशतवाद असे म्हणत कायम लक्ष केलं होतं. तसं पाहिलं तर कोकणात शिवसेना आणि राणे वाद कायम आहे त्याचप्रमाणे राणे आणि केसरकर वाद तीव्रतेने समोर येताना दिसतोय. 

जेव्हा दीपक केसरकर सावंतवाडी नगरपालिकेत नगराध्यक्ष पदावर होते तेव्हापासून केसरकर आणि राणे यांच्यात वैर आहे. २००९ मध्ये पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीत दीपक केसरकर राष्ट्रवादी काँग्रेसकडून उभे राहिले. त्यावेळी शरद पवारांनी राणे आणि केसरकर यांच्यात समेट घडवून आणला. पवारांनी राणेंना केसरकर यांना मदत करण्यास सांगितले. त्यामुळे दीपक केसरकर 2009 मध्ये सावंतवाडी मतदारसंघात आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर ही राणे आणि केसरकर यांच्यातील वैर कमी झालं नाही. २०१४ च्या विधानसभा निवडणुकिच्या आधी केसरकर शिवसेनेत गेले आणि त्यांनी नारायण राणेंवर निशाणा साधायला सुरुवात केली. राणे आणि कुटुंबाची कोकणात दहशत असल्याचा आरोप केसरकरांनी केला.

राणे आणि त्यांच्या मुलाची दहशत कोकणात असल्यामुळे सिंधुदुर्गातील प्रगतील धोक्यात आहे. असा प्रचार केसरकरांनी केला. याचा फटका निलेश राणे यांना बसला आणि त्यांचा पराभव झाला. केसरकरांनी राणेंविरुद्ध जोरदार कॅम्पेन केलं आणि त्यामुळे २०१४ विधानसभा निवडणुकीत नारायण राणे पराभूत झाले. हा पराभव राणेंच्या फारच जिव्हारी लागला. दुसरीकडे शिवसेनेने याचा फायदा करून घेतला. राणे विरोधात त्यांना विरोधक हवा होता तेव्हा शिवसेनेने केसरकरांना बळ दिलं. २०१४ मध्ये केसरकर गृहराज्यमंत्री आणि सिंधुदुर्गाचे पालकमंत्री झाले. त्यानंतर तर केसरकर राणेंविरोधात खूपच आक्रमक झाले. नारायण राणे आजही तो पराभव विसरु शकलेले नाहीत आणि तेव्हापासून सुरु असेलेलं वैर आजही कायम आहे. 

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.